⁠ 
गुरूवार, डिसेंबर 5, 2024
Home | कृषी | शेतकऱ्यांनो लक्ष द्या : पोटॅशयुक्त खतांच्या वापराबाबत प्रशासनाने केले आवाहन

शेतकऱ्यांनो लक्ष द्या : पोटॅशयुक्त खतांच्या वापराबाबत प्रशासनाने केले आवाहन

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ७ ऑगस्ट २०२२ । पोटॅश म्हणजेच पालाश युक्त खते ही पिकांसाठी उपयुक्त खते आहेत. पोटॅश युक्त खते ही पिकांच्या शरीरात तत होणाऱ्या रासायनिक व भौतिक घडामोडीसाठी स्टार्च व शर्करा तयार करणे व त्यांच्या वहनासाठी व वनस्पतीची खोडे मजबूत होण्यासाठी उपयोग होतो. परिणामी पिकांचे कीड रोगापासून संरक्षण होते. पोटॅश हा उत्पादनाची चव रंग तजेलदारपणा व टिकावू क्षमता हे गुण ठरविणारा घटक आहे. याचा परिणाम बाजारात चांगल्या प्रतिचे उत्पादनाला चांगला बाजारभाव मिळण्यास होतो. वातावरणातील अचानक बदलामुळे पिकांवर येणारा जैविक अजैविक ताण यांना सामोरे जाताना पोटेंश पिकांना मदत करत असतो.


बाजारात म्युरेट ऑफ पोटॅश हे खत मुख्य स्त्रोत म्हणून शेतात वापरले जाते. साधारणतः मिठासारखे दिसणारे चूर्ण किंवा दाणेदार स्वरूपात ही खते बाजारात उपलब्ध असून म्युरेट ऑफ पोटॅश खतामध्ये 60% पोटेश म्हणजे पालाशचे प्रमाण असते, म्हणजेच 50 किलोच्या बॅग मध्ये 30 किलो पालाश पिकाला मिळते परंतु बाजारात उसाच्या मळीपासून प्रक्रिया करून बनविलेले पोटॅश डिराईव्हाड फ्रॉम मोलॅसेस (PDM) नावाचे पोटॅश खत उपलब्ध आहे. यात मात्र पालाशचे प्रमाण 14.50% म्हणजे 50 किलोच्या बॅग मध्ये साधरण 7.25 किलो पोटॅश पिकाला मिळते. म्युरेट ऑफ पोटॅश व पिडीएम यामध्ये होणान्या गफलतीमुळे कृषी विद्यापीठ शिफारशीप्रमाणे खताचे प्रमाण योग्य दिले जात नाही. परिणामी पिकांची वाढ व उत्पादनावर परिणाम होतो.


पोटॅश खते खरेदी करताना खताच्या पिशवीवरील पोटॅशचे प्रमाण वाचून अथवा माहिती घेऊन खताची खरेदी करावी. पिकांना खताची मात्रा वापरतांना पीडीएममधून प्रति बॅग 7.25 किलो तर म्युरेट ऑफ पोटॅश मधून प्रति बंग 30 किलो पालाश मिळते या गोष्टीचा विचार करून खताची मात्रा ठरवावी. “कृषिक अॅप” नावाने महाराष्ट्र शासन, कृषि विभाग व कृषि विज्ञान केंद्र बारामती यांच्या संयुक्त सहकार्याने एक मोबाईल अॅप तयार केले आहे. त्याचा वापर करुन पिकाला खताची मात्रा व किंमत यांचे परिगणना करून खते खरेदी करावी. जेणे करुन शेतकऱ्यांच्या पीक उत्पादनावर होणारा खतांचा खर्च कमी होऊन चांगले व भरघोस उत्पादन मिळेल. यामुळे म्युरेट ऑफ पोटश ज्यामध्ये 60% प्रमाण असलेला खतांच्या पिश्वीचा वापर जर शेतकरी एक ॲग करत असतील तर PDM या नावाने जे खत मिळते, त्याच्या चार बॅगचा वापर केल्यास विद्यापीठाने शिफारस केल्याप्रमाणे खतांची मात्रा पूर्ण होईल, असे जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी संभाजी ठाकूर यांनी कळवले आहे.

author avatar
टीम जळगाव लाईव्ह