⁠ 
गुरूवार, एप्रिल 25, 2024

विजेसाठी शेतकऱ्यांचा ‘रास्ता रोको’ : १२ तास अखंड विजेची मागणी

जळगाव लाईव्ह न्यूज । १९ नोव्हेंबर २०२१ । महावितरणच्या अनागोंदी कारभाराला कंटाळलेल्या शेतकऱ्यांनी माजी जि.प.सदस्य विजय पाटील यांच्या नेतृत्त्वात गुरुवारी वर्डी फाटा येथे रास्ता रोको आंदोलन केले. त्यात १२ तास अखंड वीज देण्याची शेतकऱ्यांची मागणी आहे.

वर्डी सबस्टेशन ते ३३/११ मध्ये ५ एम.व्ही.ट्रान्सफाॅर्मर त्वरित मिळवा, सहा महिन्यापासून जळालेल्या वर्डी परिसरातील कृषी ट्रान्सफाॅर्मर त्वरित मिळावे, चोरीला गेलेले रोहित्र त्वरित बसवावे, शासनाच्या आदेशानुसार फक्त एक बिल भरून शेतकऱ्यांना रोहित्र उपलब्ध करून द्यावे, वर्डी ग्रामपंचायत हद्दीतील गावठाणची डीपी जळालेली आहे ती त्वरित बसवावी, शेतकऱ्यांना पूर्ण १२ तास वीज मिळावी अशा मागण्या शेतकऱ्यांनी मांडल्या. यासंदर्भात महावितरणचे अभियंता सुरज मंडोरे, अडावद पोलुस ठाण्याचे निरीक्षक किरण दांडगे यांना निवेदन देण्यात आले.

दरम्यान, वर्डी-माचला शिवारातील ३ ते ४ कृषी ट्रान्सफाॅर्मर ४ महिन्यांपासून चोरीला गेले आहेत. याकडे महावितरणच्या अभियंत्यांचे दुर्लक्ष झाले आहे. या सर्व समस्या महावितरणे सोडवाव्या, अशी मागणी करण्यात आली. शेतकऱ्याच्या समस्या सोडवल्या जातील, तसेच मागण्या वरिष्ठांना कळवल्या जातील, असे आश्वासन अभियंता मंडोरे यांनी दिले.

यांची होती उपस्थिती 

शेतकरी नंदलाल पाटील, बंटी शिंदे, डॉ. कांतीलाल पाटील, काशिनाथ पाटील, दत्तात्रय पाटील, महेंद्र पाटील, लहु धनगर, सचिन डाभे, संदीप पाटील, विनोद धनगर, नंदलाल शिंदे, दिलीप पाटील, ईश्वर पाटील आदी उपस्थित होते. महावितरणने मागण्यांची त्वरीत दखल घेऊन समस्या सोडवावी, अशी मागणी यावेळी शेतकऱ्यांनी केली.