जळगाव लाईव्ह न्यूज । २९ सप्टेंबर २०२१ । मुक्ताईनगर तालुक्यात झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. दरम्यान, नुकसानीचे पंचनामे करून शासन दरबारी ठेवण्यात आले आहेत, मात्र त्यावर अद्याप कुठलाही निर्णय झालेल्या नसल्याने उचंदा परिसरातील शेतकरी व राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी माजी महसूलमंत्री एकनाथराव खडसे यांची नुकतीच भेट घेऊन समस्यां मांडल्या.
मुक्ताईनगर तालुक्यासह उंचदा परिसरात मागील काही दिवसापूर्वी चक्री वादळ व गरपीटमुळे केळी पीक भुईसपाट होऊन शेतकऱ्याचे कोट्यावधी रूपयांचे नुकसान झाले आहे. त्या पार्श्वभुमीवर उचंदा परिसरातील शेतकरी व राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी माजी महसूलमंत्री एकनाथराव खडसे यांची भेट घेतली. यावेळी राजकीय पदाधिकाऱ्यांसह विमा कंपनी अधीकारी तसेच जिल्हातील, तालुक्यातील शासकीय अधीकारी यांनी प्रत्यक्ष पाहणी करुन पंचनामा करुन शासनाच्या दरबारी ठेवले आहे. मात्र अद्यापही यावर कुठलाही निर्णय झालेला नसल्याचे शेतकऱ्यांकडून सांगण्यात आले.
कृषीमंत्री दादा भुसेंशी केली चर्चा
शेतकऱ्यांनी मांडलेल्या समस्यांची दखल घेत माजी महसूलमंत्री एकनाथराव खडसे यांनी तात्काळ कुषीमंत्री दादा भुसे यांच्याशी दुरध्वनीद्वारे संपर्क साधला व शेतकऱ्यांनी मांडलेल्या विषयाची माहिती दिली. यावेळी कुषीमंत्री दादा भुसे यांनी १५ दिवसात विषय मार्गी लावतो, असे सांगितले. रा.काँ.चे जिल्हा सरचिटणीस ईश्वर राहणे, तालुकाध्यक्ष यु.डी. पाटील, माजी सभापती सुधाकर पाटील, जगन्नाथ पांडुरंग पाटील, ओबीसी तालुकाध्यक्ष साहेबराव सिंगतकर, युवक तालुकाध्यक्ष शाहिद खान, तालुका सरचिटणीस रविंद्र दांडगे, गोपाळ सिताराम पाटील, विनायक लक्ष्मण पाटील, प्रकाश काशीनाथ पाटील, राजेंद्र गजमल पाटील, साहेबराव ओंकार पाटील, शांताराम आत्माराम पाटील, साहेबराव किसन पाटील, बंडु त्रबंक पाटील, जितेंद्र गजमल पाटील यांनी माजी महसूलमंत्री एकनाथराव खडसे यांचे आभार मानले.