⁠ 
शनिवार, नोव्हेंबर 23, 2024
Home | कृषी | शेतकऱ्यांनो सावधान : मार्च महिन्यात अवकाळी पावसाची शक्यता

शेतकऱ्यांनो सावधान : मार्च महिन्यात अवकाळी पावसाची शक्यता

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


जळगाव लाईव्ह न्यूज । १ मार्च २०२३ । जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खबरदारीचा इशारा देण्यात आला आहे.कारण मार्च महिन्यात जिल्ह्यात अवकाळीचा शक्यता आहे. यामुळे शेतकऱ्यांनी खबरदारी घेणे गरजेचे आहे.

फेब्रुवारी व मार्च हे दोन महिने वातावरण संक्रमणाचे असतात. कारण या महिन्यांमध्ये थंडी कमी होत असते. तर उन्हाळ्याचे चटके जाणवायला लागतात. अशा वेळी अवकाळी पावसाचा अंदाज नेहमीच दर्शवला जातो. यंदाही मार्च महिन्यात जिल्ह्यात अवकाळी पावसाचा अंदाज वर्तवला गेला आहे.

गेल्या काही दिवसांपासून सकाळी कडाक्याचा ऊन तर रात्री थंडी अशी स्थिती पाहायला मिळत आहे. याच प्रकारे येत्या काही दिवसात ४० अंशापर्यंत्त तापमानाचा अंदाज जाण्याची शक्यता आहे. तर मार्च महिन्यादरम्यान अवकाळी पावसाचा अंदाज आहे. जळगाव जिल्ह्यासह संपूर्ण उत्तर महाराष्ट्रात पावसाची हजेरी लागण्याची शक्यता आहे

सद्यस्थितीत शेतकऱ्यांच्या रब्बी हंगाम काठडीवर आता आला असून शेतकऱ्यांकडून गहू हरभरा काढण्यावर आला आहे. तर लवकर काढून घेतल्यास शेतकऱ्यांची अवकाळी मुळे होणारे नुकसान काही अंशी टाळल येऊ शकते. वातावरणाच्या संकल्पनाचा काळ असल्याने थंडी कमी होऊन तापमान वाढत आहे. यामुळे ढग तयार होतात. दरवर्षी मार्च महिन्याच्या मध्यात पावसाची स्थिती निर्माण होते. यंदाही ते ५ ते १० मार्च दरम्यान होण्याचा अंदाज आहे. त्यानंतर म्हणजेच १५ मार्च नंतर तापमान वाढवून उन्हाचा तडका वाढणार असल्याचे म्हटले जात आहे

author avatar
टीम जळगाव लाईव्ह