कर्जफेडीच्या विवंचनेतून शेतकऱ्यानं उचललं नको ते पाऊल; धरणगाव तालुक्यातील घटना

नोव्हेंबर 29, 2024 4:47 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । २९ नोव्हेंबर २०२४ । निसर्गाचा लहरीपणामुळे अपेक्षित उत्पादन मिळत नसल्याने शेतकरी कर्जाच्या बोजाखाली दबला जात असून यातूनच टोकाचे पाऊल उचलत असल्याच्या घटना घडत आहेत. अशातच कर्जबाजारी झालेल्या शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची घटना धरणगाव तालुक्यातील झुरखेडा येथे घडली. दीपक शिवाजी चौधरी (वय ४२) असे आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्याचे नाव आहे.

crime 2 jpg webp

जळगावच्या धरणगाव तालुक्यातील झुरखेडा येथे दीपक चौधरी हे आई पानूबाई, पत्नी छाया, रोहित व सत्यम अशी दोन मुलं यांच्यासह वास्तव्याला होते. आपल्या अल्प शेतीवरच कुटूंबीयांचा उदरनिर्वाह ते करीत होते. शेतीसाठी दीपक चौधरी यांनी खासगी बँक व सोसायटीकडून पाच लाखांचे व खासगी दोन ते अडीच लाख असे एकूण आठ लाख रुपयांचे कर्ज घेतले होते. शेतातून चांगले उत्पादन आल्यानंतर कर्ज फेड करायची या विचारात ते होते. मात्र सततची नापिकीमुळे ते गेल्या काही दिवसांपासून विवंचनेत होते. यातूनच त्यांनी टोकाचे पाऊल उचलल्याचे नातेवाईकांनी सांगितले.

पत्नी शेतातून परतल्यानंतर घटना उघड
दरम्यान सकाळी त्यांची पत्नी छाया या शेतात कामाला गेल्याने दीपक चौधरी हे घरी एकटेच होते. यावेळी त्यांनी दुपारी एकच्या सुमारास घरात विषारी द्रव पिवून आत्महत्या केल्याचे सांगण्यात आले. दुपारी त्यांची पत्नी शेतातून घरी आल्यावर ही घटना समोर आली. पतीला पाहून पत्नीने आक्रोश केला. आवाज ऐकून ग्रामस्थ धावून आले. यानंतर ग्रामस्थांनी त्यांना तातडीने जळगावच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now