⁠ 
बुधवार, जानेवारी 8, 2025
Home | जळगाव जिल्हा | अमळनेर | कर्जबाजारीला कंटाळून अमळनेर तालुक्यातील शेतकऱ्याची आत्महत्या

कर्जबाजारीला कंटाळून अमळनेर तालुक्यातील शेतकऱ्याची आत्महत्या

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १९ जून २०२१ । कर्जबाजारीला कंटाळून एका ५३ वर्षीय शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना अमळनेर तालुक्यातील दापोरी बु. उघडकीस आली आहे. पंढरीनाथ काशीनाथ पाटील (५३) असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. 

आत्महत्याग्रस्त शेतकरी पंढरीनाथ पाटील यांच्याकडे ८ ते १० बिघे शेतजमीन आहे. त्यांच्याकडे विकास सोसायटीचे सव्वा दोन लाख पीक कर्ज असून ते थकलेले आहे. तसेच त्यांनी बाहेरील पैशांची हात उचल केली असल्याचे समजते.

गेल्या तीन-चार वर्षांपासून बोंडअळी, बेमोसमी पाऊस, दरवर्षी येणाऱ्या उत्पादनात घट अशा नापिकीमुळे ते बिकट आर्थिक संकटात होते. शेतीला लागणारा खर्च, घरखर्च आदी सांसारिक आर्थिक प्रपंच कसा भागवावा, या कारणाने ते नैराश्येचे जीवन जगत होते. या कारणामुळे त्यांनी कंटाळून आत्महत्या केली, असे त्यांच्या नातेवाइकांनी सांगितले.

त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, दोन मुली, एक भाऊ, जावई, नातवंडे असा परिवार आहे. ते माजी ग्रामपंचायत सदस्य साहेबराव काशीनाथ पाटील यांचे लहान भाऊ होत.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.