जळगाव लाईव्ह न्यूज । १६ मार्च २०२१ । यावल तालुक्यातील न्हावी येथे एका आदिवासी शेतमजुराने विहीरीत उडी मारून आत्महत्या केल्याची घटना सोमवारी रात्री घडली आहे. प्यारसिंग रेमसिंग बारेला (वय ४५) असे आत्महत्या केलेल्या मजुराचे नाव आहे. दरम्यान, याप्रकरणी पोलीसात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे.
न्हावी येथील शेतकरी टेनु बोरोले यांच्या न्हावी शिवारातील शेतात काल १५ मार्च रोजी रात्री ११.३० वाजेच्या सुमारास त्याच शेतात कामास असलेल्या प्यारसिंग बारेला यांनी विहीरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. प्यारसिंग बारेला याच्या मृतदेहाचे शवविच्छेदन यावलच्या ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी डॉ .बी बी बारेला यांनी केले.
याबाबत फैजपूर पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली असून पुढील तपास स.पो.नि. प्रकाश वानखेडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे. प्यारसिंग बारेला यांच्या पश्चात पत्नी, दोन विवाहीत मुली आणि एक मुलगा आहे.