शेतकऱ्याची विषारी औषध सेवन करून आत्महत्या

जळगाव लाईव्ह न्यूज । २३ मे २०२२ । पारोळा तालुक्यातील करमाड येथे एका शेतकऱ्याने २२ रोजी सकाळी १० वाजता आपल्या शेतात विषारी औषध सेवन केले हाेते. उपचारा दरम्यान या शेतकऱ्याचा मृत्यू झाला. मुमताज रतन राठोड (वय ४०) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे.

suicide 6 jpg webp

राठोड हा आपल्या आईसोबत शेतात काम करत हाेता. या वेळी मुमताज याने शेताच्या बाजुला जावून विषारी औषध सेवन केले. त्यांना पारोळा कुटीर रुग्णालयात दाखल केले. उपचारा दरम्यान या शेतकऱ्यांचा मृत्यू झाला आहे. याबाबत भीमा राठोड यांच्या माहितीवरुन घटनेची नाेंद करण्यात आली आहे.

Advertisements

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now