⁠ 
शनिवार, एप्रिल 13, 2024

प्रसिद्ध अहिराणी गायक नवल माळी यांचे निधन

जळगाव लाईव्ह न्यूज । ९ जानेवारी २०२३ । प्रसिद्ध अहिराणी गायक नवल माळी यांचे शनिवारी धरणगाव तालुक्यातील वंजारी खपाट येथे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांनी गायलेले ‘साली नंबर वन् ‘ हे अहिराणी गीत प्रचंड गाजले होते. आजही अनेक डीजे वर अनेक तरुण थिरकतांना दिसतात.

आज अहिराणीत योगदान असलेला अहिराणीचा खरा कलावंत गेल्याचे दुःख अनेक अहिराणी कलावंतांमध्ये आहे. नवल माळी यांची परिस्थिती खूप नाजूक होती, प्रचंड काम करूनही अहिराणी कलावंतांची झोळी खाली राहिली. अशोक चौधरी यांनी अहिराणी चित्रपटात नवलजी हमखास असायचे.

मुंबईच्या फाईव्ह स्टार हॉटेल्स मध्ये ह्या गीतावर हौशी लोक नाचत असत. गुजरातच्या अहमदाबाद, सुरत व बडोदा शहरात ह्या गीताच्या सिडी, कॅसेटच्या विक्रीने उच्चांक गाठला होता. नवल माळी याचे अहिराणीमध्ये फार मोठे योगदान होते. त्यांनी शेकडो अहिराणी चित्रपटांमध्ये भूमिका साकारली आहे.