⁠ 
शनिवार, नोव्हेंबर 23, 2024
Home | जळगाव जिल्हा | जळगाव शहर | दिवाळीपूर्वी सुकामेव्याच्या दरात घसरण ; वाचा जळगावातले ताजे दर

दिवाळीपूर्वी सुकामेव्याच्या दरात घसरण ; वाचा जळगावातले ताजे दर

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । चेतन पाटील । अफगाणिस्तानमधील तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान देशभरासह जळगावात देखील सुका मेव्याच्या भावात ऑगस्टच्या महिन्यात मोठी वाढ झाली होती. परंतु गेल्या दोन महिन्यात सुका मेव्याचे भाव स्थिरावले आहे. दिवाळीच्या पार्श्‍वभूमीवर बाजारात आवक वाढली आहे. त्यामुळे दिवाळीपूर्वी सुकामेव्याच्या दरात घसरण झाली आहे. पंधरा दिवसापूर्वी जळगावात बदामाचा प्रति किलोचा भाव १००० रुपयांवर होता. त्यात गेल्या १५ दिवसात प्रति किलो २०० ते २५० रुपयाची घसरण झाली आहे. याचा फायदा खरेदीदार आणि ग्राहकांना मिळत आहे.

काही दिवसांवर दिवाळी येऊन ठेपली आहे. दिवाळीनिमित्त काही संस्था, संघटना, कंपन्या आपल्या कर्मचाऱ्‍यांना सुकामेवा भेट देतात. तर हिवाळ्याला देखील सुरुवात झाली असून यादरम्यान, सुका मेव्याला मागणी असती. बाजारात बदाम, काजू, मनुके, अक्रोड, पिस्ता आणि चारोळ्याच्या उत्पादनात मोठी वाढ झाल्याने दर घटले आहेत. सुकामेव्याचे दर कमी झाल्याचा फायदा दिवाळीत सामान्यांना होणार आहे.

देशभरातील बहुतेक मार्केटमध्ये सुकामेवा हा अफगाणिस्तानातून येत असतो. ऑगस्टमध्ये अफगाणिस्तानात तालिबाने सरकार हातात घेतल्यानंतर देशातील अनेक भागात ड्राय फ्रूटचे दर वाढविण्यात आले होते. परिणामी जळगावात बदामाचे दर १०५० रुपयापर्यंत गेले होते. तर काजू देखील १०५० ते ११०० रुपयापर्यंत गेले होते. याशिवाय पिस्ताच्या किंमतीही वाढल्या आहेत. मात्र, गेल्या दोन महिन्यात बदामाच्या प्रति किलोच्या भावात ३०० ते ३५० रुपयाची घसरण झाली आहे. तर काजूच्या प्रति किलोच्या भावात ३०० ते ३५० रुपयाची घसरण झाली आहे. या भाव घसरणीचा फायदा ग्राहकांना दिवाळीसाठी आणि हिवाळ्यासाठी चांगलाच होणार आहे.

सध्याचे जळगावातले सुका मेव्याचे दर 

बदाम – ७५० ते ८०० रुपये प्रति किलो (पंधरा दिवसापूर्वी १०५० रु. किलो)

काजू – ७५० ते ८०० रुपये प्रति किलो

मनुका – ३२० रुपये प्रति किलो

खारीक – २२० ते २४० रुपये किलो

खोबरा – २६० ते २८० रुपये किलो

चारोळ्या – १६०० रुपये किलो

डिंग – २४० रुपये किलो

 

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.