---Advertisement---
जळगाव जिल्हा राजकारण

फॅक्ट चेक : जरांगे पाटलांच्या नावाने खोटी पोस्ट ; स्मिताताईंसह मराठा समाज संतापला

---Advertisement---

जळगाव : जळगाव लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवार स्मिताताई वाघ यांच्या नावाने मनोज जरांगे पाटील यांच्या विषयी एक खोटी पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. लोकसभेचा प्रचार अंतिम टप्प्यात आला असतांना कुणीतरी खोडसाळपणा करुन समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. एबीपी चॅनलचे नाव वापरुन हा घाणेरडा प्रकार केल्याचे समोर आले असून या प्रकाराबाबत संबंधित आरोपींविरुध्द भाजपाकडून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे. दरम्यान या प्रकाराचा मंत्री गिरीश महाजन, स्मिताताई वाघ यांच्यासह मराठा समाजाने तीव्र शब्दात निषेध केला आहे.

Jarange Patil Smita Wagh jpg webp

जळगाव लोकसभा मतदार संघातील प्रचार शिगेला पोहचला आहे. संपूर्ण मतदारसंघात स्मिताताई यांच्या जोरदार प्रचार सुरु असल्याने त्यांचे पारडे जड मानले जात आहे. त्यांच्या प्रचारासाठी महायुतीचे सर्व नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते मैदानात उतरले आहेत. स्मिताताईं ज्या ज्या ठिकाणी प्रचारासाठी जात आहेत. तेथे सर्वच ठिकाणी त्यांचे उत्स्फूर्तपणे स्वागत केले आहे. त्यांना मोठं मताधिक्य मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे. अशा परिस्थितीत कुणाकडून तरी स्मिताताईंच्या नावाचा गैरवापर करुन खोट्या पोस्ट व्हायरल केल्या जात आहेत.

---Advertisement---

प्रचाराच्या तोफा थंडावण्याच्या काही तास आधी, ‘खासदार झाल्यास मनोज जरांगे पाटील यांच्या अटकेची मागणी करणार’ अशी पोस्ट करुन त्यावर एबीपीमाझा लोगो व स्मिताताईंचा फोटो वापरण्यात आला आहे. हा खोडसाळपणा समोर आल्यानंतर संपूर्ण जिल्ह्यात संतापाची लाट उसळली आहे. मंत्री गिरीश महाजन, स्मिताताई वाघ, भाजपासह संपूर्ण मराठा समाजातर्फे या प्रकाराचा निषेध व्यक्त करण्यात येत आहे.

स्मिताताई म्हणाल्या की, आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण जीवनात पाळणारे आहोत. शिवछत्रपतींच्या काळात महिलांना सन्मान मिळत होता. मात्र आता काही विरोधक महिलांच्या नावाने असे प्रकार करुन महिलांचा अपमान करत आहेत. मराठा समाजाबद्दल अशी आक्षेपार्ह करुन समाजात तेढ निर्माण करण्याचा हा प्रयत्न आहे. याविरोधात आम्ही कायदेशीर कारवाई करणार आहोतच. मात्र शिवछत्रपतींच्या विचारांचा व महिलांचा अपमान करणाऱ्या अशा प्रवृत्तींना मतदारच उत्तर देतील, असे स्मिताताई म्हणाल्या.

गिरीश महाजन म्हणाले की, विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. त्यांना त्यांचा पराभव समोर दिसू लागला आहे. यामुळे समाजांमध्ये तेढ निर्माण करुन स्वत:ची राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून होत आहे. मात्र त्यांना सुज्ञ मतदार त्यांना त्यांची जागा दाखविल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---