⁠ 
शनिवार, सप्टेंबर 14, 2024
Home | गुन्हे | भुसावळात लाखो रुपयांच्या नकली नोटा जप्त, तिघांना अटक

भुसावळात लाखो रुपयांच्या नकली नोटा जप्त, तिघांना अटक

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ५ सप्टेंबर २०२४ । भुसावळात तीन लाखांच्या नकली नोटा जप्त करण्यात आल्या असून यामुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. याबाबत भुसावळ बाजारपेठ पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. सय्यद मुशारद अली मुमताज अली (वय ३८, रा. दुश्मनीय पार्क शिवाजीनगर जळगाव), नदीम खान रहीम खान (वय ३,० रा. सुभाष चौक शनिवार पेठ जळगाव), अब्दुल हकीम अब्दुल कादर (वय ५७, अब्दुल अमित चौक रसलपुर रोड रावेर) अशी अटक करण्यात आलेल्या तिघांची नावे आहेत.

नेमकी घटना काय?
याबाबत असे की, काहीजण भुसावळ शहरात बनावट नोटा विक्रीसाठी घेऊन येत आहेत, अशी गोपनीय माहिती बाजारपेठ पोलिस निरीक्षक राहुल वाघ यांना मिळाली. त्यानुसार पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांनी पथक तयार करून भुसावळ शहरात सापळा रचला. व बनावट नोटांसह बुधवारी तिघांना अटक केली.

संशयित एक लाखाच्या खर्‍या नोटांच्या बदल्यात तीन लाखांच्या बनावट नोटा देणार असल्याने पोलिसांनी पूर्ण तयारी केली होती. बुधवारी सायंकाळी संशयितांनी तीन ठिकाणे बदलल्यानंतर एका ठिकाणी त्यांनी व्यवहार पूर्ण केला. व्यवहार पूर्ण झाल्यावर दबा धरून बसलेल्या पोलीस पथकातील कर्मचाऱ्यांनी त्यांना ताब्यात घेतले. रात्री उशिरा स्टेट बँकेच्या अधिकार्‍यांकडून नोटांचे व्हेरिफिकेशन करण्यात आले.

दरम्यान, या नोटा संशयित आरोपींनी कुठून आणल्या? याआधी किती वेळा त्यांनी बाजारात नकली नोटा विक्री केल्या? त्यांचा गॉडफादर कोण? यासह अनेक प्रश्नांची उत्तरे चौकशीनंतर समोर येऊ शकतात.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.