जळगाव लाईव्ह न्यूज । २२ फेब्रुवारी २०२५ । राज्यात बनावट नोटांचा सुळसुळाट पाहायला मिळत असून अशातच खान्देशातील बनावट नोटांच्या रॅकेटचा पदार्फाश झाला. नंदुरबारमध्ये १ लाख रुपयांच्या असली नोटांच्या बदल्यात ६ लाख रुपयांच्या बनावट नोटा देण्याचं आमिष दाखवत लुटणाऱ्यांचा पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. याप्रकरणी दोन जणांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

गेल्या अनेक महिन्यांपासून नंदुरबार जिल्ह्यात बनावट नोटांचा सुळसुराट सुरू आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कारवाई करत जप्त केले १ लाख ८० रुपयांचे बनावट नकली नोटा जप्त केल्या आहेत. ज्यांना अटक करण्यात आलीय, ते १ लाख रुपयांच्या असली नोटांचा बदल्यात ६ लाखांचे बनावट नोटा देत होते.
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कारवाई करत १ लाख ८० रुपयांच्या बनावट नकली नोटा जप्त केल्या आहेत. पोलिसांनी बनावट नोटांचे ३ बंडल पोलिसांनी जप्त केले आहेत. बनावट नोटा देऊन लुटण्याच्या प्रयत्नात आलेल्या दोन जणांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.