⁠ 
शुक्रवार, मे 3, 2024

फैजपुर येथे 32व्या द्वि-दिवसीय राष्ट्रीय परिसंवाद

जळगाव लाईव्ह न्यूज । १२ मार्च २०२२ । समाजाला राजकीय आणि आर्थिक दृष्टया साक्षर करण्याची गरज आहे असे प्रतिपादन सत्यजित तांब महाराष्ट्र युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजित तांबे यांनी केले.

रावेर तालुक्यातील फैजपुर येथील धनाजी नाना महाविद्यालय व’महाराष्ट्र राज्य वाणिज्य परिषदेच्या राष्ट्रीय परिषदेत उद्घाटक म्हणून ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार तथा तापी परिसर विद्या मंडळाचे अध्यक्ष शिरीषदादा चौधरी होते. सत्यजीत तांबे म्हणाले, देशातील जनतेला पारंपरिक शिक्षणासोबतच आर्थिक आणि राजकीय दृष्टया साक्षर करण्याची गरज आहे, तसेच बालवाडी ते पदव्युत्तर शिक्षणातील सर्व स्तरावरील विद्वानांना प्रामुख्याने शिक्षकांना एकत्रित करून शैक्षणिक धोरण निश्चित केले पाहिजे आणि जे पदव्युत्तर स्तरावर शिकविले जाणार आहे. त्याची जाणीव बालवाडी पासूनच विद्यर्थ्यांना व्हावी म्हणून शिक्षणाची आखणी केली गेली पाहिजे असे सांगितले. वॉरण बफेट चे उदाहरण देऊन जीवनातील आर्थिक गणित जुडवून घेण्यासाठी नियोजनबद्ध गुंतवणूकीचे आणि बचतीचे महत्व पटवून दिले. तसेच शिक्षकांच्या मागण्यांवर प्रकाश टाकत शिक्षकांच्या समस्या ह्या समाजाच्या समस्या आहेत आणि त्या सोडविण्यासाठी निश्चितच प्रयत्न केले जातील अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

सकाळी फैजपुर काँग्रेसच्या स्मृती प्रित्यर्थ निर्माण करण्यात आलेल्य प्रेरणा-स्तंभची अभिवादन करून स्व. धनाजी नाना चौधरी यांच्या पुतळ्यास माल्यार्पण करण्यात आले. एन सी सी चे कॅडेट यांनी पाहुण्यांना गार्ड ऑफ ऑनर देऊन मंचाकडे आमंत्रित केले.
दीप प्रज्वलन आणि मान्यवरांचे स्वागत-सत्कार करण्यात आला. त्यानंतर महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजिय तांबे यांच्या हस्ते उदघाटन करून परिषदेची सुरुवात करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी संस्थेचे अध्यक्ष व रावेर-यावल विधानसभेचे आमदार आदरणीय शिरीष चौधरी होते. प्रमुख पाहुणे म्हणून माजी खासदार डॉ.उल्हास पाटील, डॉ.जी.एम.तल्हार, संस्थापक अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य वाणिज्य परिषद, डॉ.बी.बी. तायवाडे, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य वाणिज्य परिषद, डॉ.जी वाय शितोळे, डॉ.आर.के टेलर, कार्यकारी अध्यक्ष तसेच लीलाधर चौधरी, चेअरमन, तापी परिसर विद्यामंडळ, फैजपुर
उपाध्यक्ष के.आर.चौधरी, मिलिंद वाघूळदे, एम.टी.फिरके, ओंकार सराफ, डॉ. एस.एस.पाटील, संजय चौधरी, प्रभात चौधरी, कुलदीप शर्मा, धनंजय चौधरी, उपप्राचार्य व परिषदेचे समन्वयक डॉ.ए.आय.भंगाळे, डॉ.जी.जी. कोल्हे, प्राचार्य डॉ.व्ही.आर.पाटील, प्राचार्या डॉ.पिंगला धांडे, डॉ.महेश जोशी, डॉ.जे के शर्मा, डॉ. जयश्री सूर्यवंशी, डॉ. शिवप्रसाद डोंगरे, डॉ. डी एम खंडारे, डॉ. निषिकांत झा, प्रा.एस. जे.पाटील, तापी परिसर विद्यामंडळ, फैजपुर संस्थेचे सर्व पदाधिकारी आणि महाराष्ट्र राज्य वाणिज्य परिषदेचे पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमच्या यशस्वी आयोजनासाठी डॉ. रवी केसूर, डॉ.निखिल वायकोळे, डॉ. आरती भिडे, प्रा. सचिन भिडे व महाविद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. सूत्र संचालन डॉ. राजश्री नेमाडे, डॉ. आर.आर. राजपूत, डॉ.सीमा बारी यांनी व आभार डॉ.बी.बी.तायवाडे यांनी मानले.

यांना पुरस्कार

डॉ. माधवी कुलकर्णी यांना, डॉ. पी सी शेजवलकर आणि कै महादेवराव तल्हार आदर्श शिक्षक पुरस्कार व
प्रा.अशोक कोकाटे यांना सौरव शिवरे यांच्या स्मरणार्थ तरुण संशोधक पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.

सहयोगी सदस्य म्हणून निवड
महाराष्ट्र वाणिज्य पतिषदेच्या सहयोगी सदस्य म्हणून डॉ. अरविंद चौधरी,डॉ.माधवी कुलकर्णी, डॉ. एन गुरव, डॉ. अजय भामरे, डॉ.वाल्मिक सरवदे, डॉ अरुण गायकवाड, डॉ. कुलदीप शर्मा, डॉ. शिवप्रसाद डोंगरे, डॉ.निशिकांत झा, डॉ. ममताबेन पाटील यांची निवड करण्यात आली.

पुरस्कारासाठी देणगी
आमदार शिरीष मधुकरराव चौधरी यांच्या तर्फे लोकसेवक स्व.मधुकरराव चौधरी जीवन गौरव पुरस्कार साठी परिषदेला एक लाख रुपये देणगी देण्यात आली. डॉ. डी. एम.ललवाणी यांच्यातर्फे स्व. स्वप्नील ललवाणी, ‘तरुण समाजसेवी संशोधक प्राध्यापक पुरस्कारा’साठी एकावन्न हजार रुपये देणगी देण्यात आली.