⁠ 
सोमवार, मे 6, 2024

Fact Check : जळगावात ३० जूनपर्यंत रोज ८ तास लोडशेडिंग?

जळगाव लाईव्ह न्यूज । ९ एप्रिल २०२२ । सध्या सोशल मीडियाचा वापर मोठ्याप्रमाणात वाढला असून सोशल मीडियावर आलेला मेसेज हा खराच असतो असे नाही, मात्र असे काही मेसेज वाचून नागरिकांमध्ये संभ्रम देखील निर्माण होत असतो. गेल्या दोन दिवसांपासून सोशल मीडियावर ३० तारखे पासून लोड शेडींग सुरु होईल अशी बातमी फिरते आहे. मात्र या बातमीत कोणतेही तथ्य नसल्याचे महावितरण कडून सांगण्यात आले आहे.

गेल्या काही दिवसांपासून प्रत्येकाच्या मोबाईलवर येत्या काही दिवसात लोड शेडींग सुरु होईल असे मेसेज फिरत आहे. त्या सोबत एक आदेश देखील जोडण्यात येत आहे. जोडलेल्या आदेशामुळे नागरिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण झाले आहे. काही संघटनांनी तर यावरून निवेदन देखील द्यायला सुरुवात केली आहे. मात्र यामध्ये कोणतेही तथ्य नसल्याचे महावितरण ने सांगितले आहे.

काय आहे व्हायरल मेसेज
30 जूनपर्यंत दिवसातून 8 तास लोडशेडिंग होणार…!

काय आहे तथ्य
हे भारनियमनाचे आदेश/पत्र नाही. शेतीला ८ तास वीजपुरवठा करण्यात येतो. त्यासंबंधीचे असून दर तीन महिन्यांनी असे आदेश जारी करण्यात येतात. त्यामुळे 8 तास भारनियमन होणार, असा अप्रचार करण्यात येत असून त्यात कुठलेही तथ्य नाही.

  • महावितरण