⁠ 
गुरूवार, मे 23, 2024

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी ‘कॅशलेस मेडिक्लेम’ ची सुविधा

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज। २० जुलै २०२३। आमदार सत्यजित तांबे यांनी सरकारी कर्मचाऱ्यांना महात्मा फुले जीवनदायी आरोग्य योजनेप्रमाणे ‘कॅशलेस मेडिक्लेम’ उपलब्ध करून देण्याचा प्रश्न उपस्थित केला. श्री. केसरकर यांनी याकडे लक्ष देणार असल्याचे आश्वासन दिले आहे.

आमदार सत्यजित तांबे यांनी नुकतेच सुरु असलेल्या पावसाळी अधिवेशनात हा प्रश्न उपस्थित केला आहे.या आधीही त्यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात यापूर्वी याबाबतची मागणी केली होती. राज्यातील सर्व सरकारी कर्मचाऱ्यांच्या मेडिकल बिलांची कॅशलेस पद्धतीने व्यवस्था करण्यात यावी, अशी मागणी श्री. तांबे यांनी केली.

तसेच, राज्य कामगार विमा योजनेत सुधारणा करण्यासाठी समिती नेमली आहे का? या समितीत सुसूत्रता आणण्यासाठी काही शिफारशी केल्या आहेत का? महात्मा फुले जनआरोग्य योजना पाच लाखांपर्यंतची कॅशलेस सुविधा सर्व सरकारी कर्मचाऱ्यांना लागू होणार आहे का? असे प्रश्न श्री. तांबे यांनी उपस्थित केले.

त्यावर श्री. केसरकर म्हणाले की, महात्मा फुले जनआरोग्य योजनेची कॅशलेस सुविधा दीड लाखापासून पाच लाखांपर्यंत वाढविण्यात आली असून, राज्यातील १०० टक्के लोकांना विमा संरक्षण देण्यात येणार आहे. लवकर पाच लाखांपर्यंत कॅशलेस बिलाची व्यवस्था केली जाईल. त्यानंतर पुढील मागण्यांवर सरकार सकारात्मक विचार करेल.