⁠ 
शनिवार, नोव्हेंबर 23, 2024
Home | जळगाव जिल्हा | यावल | ग्रामपंचायतीच्या टक्केवारीसाठी दलित वस्तीचे काम निकृष्ट दर्जाचे

ग्रामपंचायतीच्या टक्केवारीसाठी दलित वस्तीचे काम निकृष्ट दर्जाचे

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ७ नोव्हेंबर २०२२ । यावल तालुक्यातील डोंगर कठोरा ग्रामपंचायतमार्फत कॉन्ट्रॅक पदतीने ठेकेदार ठेका देण्यात येतो दलीत वस्तीचे काम ग्रामपंचायतीच्या टक्केवारीच्या स्वार्थासाठी पोटी दलीत वस्तीचे काम निकृष्ट दर्जाचे आहे असे आदळून आले आहे. या कामांची चौकशी करून कार्यवाही करण्यात यावी अन्यथा तिव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा निळे निशान संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष अशोक तायडे यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.

या संदर्भात अशोक तायडे यांनी समाज कल्याण विभाग अधिकाऱ्यांकडे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, डोंगर कठोरा या ग्रामपंचायत अंतर्गत दलीत वस्तीमध्ये शासनाचे लाखो रूपये खर्च करीत कॉक्रीट रस्ता व गटारी आदी कामे करण्यात आली. ही सर्व कामे शासकीय नियम प्रमाणे ठरवून दिलेल्या साहित्य न वापरता निकृष्ट प्रतिचे साहित्य वापरून दलीत वस्तीतील समाज बांधवाची आर्थिक स्वार्थाला बळी पडुन ठेकेदार व अधिकारी मंडळी दिशाभुल करणाऱ्या यावल पंचायत समितीतील अधिकारी यांच्या कार्यपद्धतीची तात्काळ चौकशी करण्यात यावी. तसेच टक्केवारीच्या बळावर गुणवतापुर्ण काम न करता अत्यंत निकृष्ट काम करणाऱ्या ठेकेदाराचे नांव काळ्या यादीत टाकावे तसे न झाल्यास निळे निशान संघटनेच्या वतीने तिव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा संघटनेचे जिल्हा उपाध्याक्ष अशोक तायडे यांनी दिला आहे.

author avatar
टीम जळगाव लाईव्ह