⁠ 
शनिवार, नोव्हेंबर 23, 2024
Home | जळगाव जिल्हा | रावेर | स्पर्धेच्या युगात अवांतर वाचन आवश्यक : धनंजय चौधरी

स्पर्धेच्या युगात अवांतर वाचन आवश्यक : धनंजय चौधरी

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ०३ जुलै २०२१ । आजचे युग हे स्पर्धेचे युग आहे या युगात टिकायचे असेल तर अभ्यासाबरोबर अवांतर वाचन हे केले पाहिजे. मानवी जीवनात वाचन हा एक प्रगतीचा पाया आहे. जर आपली प्रगती साधायची असेल ध्येय गाठायचे असेल तर वाचन क्षमता वाढवावी असे प्रतिपादन काँग्रेसचे युवानेते आमदार पुत्र धंनजय चौधरी यांनी पुनखेडा येथे बोलताना केले.

रावेर यावल मतदारसंघातील पुनखेडा येथील तरुणांना स्पर्धात्मक परीक्षेची तयारी साठी स्पर्धा परीक्षा पुस्तकाची कमतरता व अडचण होत होती ही अडचण येथील तरुणांनी तालुक्याचे आमदार शिरीष चौधरी याना सांगितल्याने आमदार यांनी शिक्षणाचा महत्व समजून तात्काळ स्पर्धा परीक्षांची पुस्तक उपलब्ध करण्यात आला त्यावेळी युवानेते धंनजय चौधरी हे बोलत होते.स्पर्धा परीक्षांची पुस्तके युवानेते धंनजय चौधरी यांच्या हस्ते आज देण्यात आली त्यावेळी सोबत श्री दिपक पाटील(प,स सदस्य)श्री योगेश पाटील(सरपंच मुजलवाडी) सरपंच प्रवीण पाटील श्री सचिन पाटील ,श्री संतोष पाटील ,श्री बाळा बोरणारे, श्री संदीप पाटील, श्री प्रवीण चौधरी ,व असंख्य युवक उपस्थित होते
यावेळी बोलताना युवानेते चौधरी म्हणलेकी विद्यार्थ्यांनी गुणिजनांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून वाटचाल करावी. आज नवनवीन क्षेत्रे खुली होत असताना या क्षेत्रात टिकायचे असेल तर आपल्या जवळ ज्ञानाचा ठेवा हवा असे ते म्हणाले.
यावेळी पुनखेड्याचे डिगंबर बोरसे(ग्रा. पं.सदस्य) आकाश चौधरी, धीरज सावळे, संदीप पाटील, चेतन पाटील, राहुल पाटील,सचिन पाटील ,सुनील कोळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन योगेश पाटील यांनी केले तर आभार संतोष पाटील यांनी मानले .

author avatar
Tushar Bhambare