---Advertisement---
जळगाव जिल्हा

शिष्यवृत्ती अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ ; ही आहेत शेवटची तारीख

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । २६ एप्रिल २०२४ । भारत सरकार शिष्यवृत्ती योजनेचे अनुसूचित जाती प्रवर्गातील जळगांव जिल्हयातील विदयार्थ्याचे सन २०२३-२४ चे विविध स्तरावर प्रलंबित असलेल्या अर्जाची संख्या लक्षात घेता त्याचप्रमाणे महाविदयालय स्तरावरील अडचणी उदा. फी निश्चित होणे, अभ्यासक्रमास मान्यता मिळणे इ. बाबी संबंधीत शैक्षणिक विभागाकडून प्रलंबित असल्यामुळे अशा अडचणी लक्षात घेऊन राज्यशासनाच्या मान्यतेने प्रलंबित अर्ज निकाली काढण्याकरीता 30 एप्रिल, 2024 पर्यत मुदतवाढ प्रदान करण्यात आलेली आहे.

online jpg webp

तरी मुदतवाढ दिलेल्या कालावधीत सन २०२३-२४ तसेच त्यापूर्वीचे प्रलंबित असलेले अर्ज ऑनलाईनरित्या निकाली काढण्यात यावेत, सदर अर्ज विहित वेळेत निकाली न काढल्यास असे अर्ज ऑनलाईन प्रणालीतून कायमस्वरुपी रदद बातल (Auto Reject) होतील याची सर्वानी दखल घ्यावी.
तसेच विदयार्थी व महाविदयालयाच्या स्तरावर अर्ज प्रलंबित राहून विदयार्थी शिष्यवृत्तीस वंचित राहिल्यास संबंधीत महाविदयालयचे प्राचार्य हे व्यक्तीशः जबाबदार राहतील याची गांभीर्यान नोंद घ्यावी असे सहायक आयुक्त समाज कल्याण, योगेश पाटील यांनी ऐका प्रसिध्दी पत्रान्वये कळविले आहे.

---Advertisement---

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---