जळगाव लाईव्ह न्यूज । हमीभावात सोयाबीन विक्रीसाठी शासनाने नोंदणीला ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ दिली आहे. यावल तालुक्यात कोरपावली येथील विकासोमध्ये ही नोंदणी सुरू आहे. कोरपावली विकासोत केंद्र शासनाच्या किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेत सोयाबीन विक्रीसाठी नोंदणी सुरू आहे.
यापूर्वी असलेली नोंदणीची मुदत आता ३१ डिसेंबरपर्यंत वाढवण्यात आली. या ऑनलाइन नोंदणीसाठी शेतकऱ्यांना ऑनलाइन सातबारा, बँक खात्याची माहिती, आधार कार्ड अशी कागदपत्रे आवश्यक आहे असल्याचे चेअरमन राकेश फेगडे यांनी सांगितले. या योजनेत एका शेतकऱ्याला हेक्टरी १० क्विंटल सोयाबीन विक्री करता येईल. ४८९२ रूपये हमीभाव आहे.