---Advertisement---
भुसावळ

प्रवाशांसाठी आनंदाची बातमी ! भुसावळ मार्गे धावणाऱ्या एलटीटी-बल्लारशाह विशेष गाडीला मुदतवाढ

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । २५ डिसेंबर २०२३ । रेल्वे गाड्यांमध्ये होणाऱ्या प्रवाशांच्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर रेल्वे प्रशासनाकडून अनेक विशेष गाड्यांना मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे. यातच आता मध्य रेल्वेने भुसावळ मार्गे धावणाऱ्या एलटीटी-बल्लारशाह-एलटीटी साप्ताहिक विशेष गाडीला आगामी मार्च महिन्यातील शेवटच्या आठवड्यापर्यंत मुदतवाढ दिली. यामुळे भुसावळकर प्रवाशांची सोय होणार आहे.

train 1

मध्य रेल्वेच्या भुसावळ विभाग प्रबंधक कार्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, २६ डिसेंबरपर्यंत अधिसूचित असलेली ०११२७ एलटीटी-बल्लारशाह विशेष गाडी आता २६ मार्च, २०२४ पर्यंत दर मंगळवारी लोकमान्य टिळक टर्मिनल्स मुंबई येथून प्रस्थान करणार आहे. त्याचप्रमाणे, २७ डिसेंबरपर्यंत अधिसूचित असलेली ०११२८ बल्लारशाह-एलटीटी ही गाडी २७ मार्च, २०२४ पर्यंत दर बुधवारी बल्लारशाह येथून प्रस्थान करणार आहे. ही गाडी दर बुधवारी रात्री ९.४० वाजता भुसावळ स्थानकावर येऊन मुंबईकडे रवाना होणार आहे. ही गाडी आता पूर्वीच्या आयसीएफ काेचऐवजी २१ डब्यांच्या एलएचबी कोचसह धावणार आहे.

---Advertisement---

या स्थानकांवर असेल थांबा :
ठाणे, कल्याण, नाशिक रोड, भुसावळ, मलकापूर, अकोला, बडनेरा, धामणगाव, पुलगाव, वर्धा, हिंगणघाट, वरोरा, चंद्रपूर

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---