किसान रॅकला मुदतवाढ; वॅगन्स भाड्यामध्ये मिळणार सूट
खासदार रक्षा खडसे यांच्या प्रयत्नांना यश
जळगाव लाईव्ह न्यूज । १ एप्रिल २०२२ । ट्रक भाड्याच्या तुलनेत अवघ्या २५ टक्के भाड्यात दिल्ली आणि कानपुर बाजारपेठेत केळी तसेच इतर शेती उत्पादने पोहचविणाऱ्या ‘किसान रॅक’ आगामी आर्थिक वर्षासाठी रेल्वे विभागाकडून मुदतवाढ देण्यात आली आहे, परंतु वॅगन्स भाड्यात पूर्वीप्रमाणे सूट (अनुदान) मिळणार की नाही, याबाबत शेतकऱ्यांमध्ये संभ्रम होता. त्यानुसार आता किसान रॅकच्या वॅगन्स भाड्यात ३१ मे २०२२ पर्यंत ४५% सूट मिळणार असल्याचे रेल्वे मंत्रालयाने परिपत्रक काढले आहे.
यासाठी बर्याच दिवसापासून खासदार रक्षा खडसे यांनी रेल्वे मंत्री आश्विनी वैष्णव, रेल्वे राज्य मंत्री रावसाहेब दानवे व अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालय यांच्याकडे पत्र व्यवहार तसेच भेट घेऊन पाठपुरावा केला होता.
मागील वर्षभरात रावेर आणि सावदा रेल्वेस्थानकावरून एकूण ३०० रॅक एवढ्या मोठ्या प्रमाणावर केळी दिल्ली येथे पाठविण्यात आली असुन, त्यामुळे शेतकऱ्यांचे प्रति क्विन्टल शेतमाला मागे ४०० रुपये एवढी बचत झालेली आहे. सदर किसान रॅकची ३१ मार्च २०२२ ला मुदत संपणार होती परंतु रेल्वे मंत्रालया मार्फत किसान रॅकला मुदतवाढसह; वॅगन्स भाड्यामध्ये ३१ मे २०२२ पर्यंत ४५% सूट देणार आहेत.
तसेच सदर भाडे अनुदान ४५ % टक्क्यांवरून पुन्हा ५०% करून ही सूट पूर्ण वर्षभरासाठी करण्यासाठी खासदार रक्षा खडसे यांच्या संबधित रेवे मंत्रालय व अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालय यांच्याकडे पाठपुरावा सुरु असुन, जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकऱ्यांच्या विकास व भरभराटीसाठी खासदार रक्षा खडसे ह्या प्रयत्नशील आहे.