भुसावळ

प्रवाशांना दिलासा! भुसावळहुन धावणाऱ्या ‘या’ विशेष ट्रेनच्या कालावधी वाढ

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २ मार्च २०२४ । खान्देशातील प्रवाशांसाठी दिलासा देणारी एक बातमी आहे. प्रवाशांची अतिरिक्त गदर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने भुसावळ मुंबई सेंट्रल विशेष गाड्यांचा कालावधी वाढवला आहे. ही गाडी जळगावसह अमळनेर नंदुरबार मार्गे मुंबई सेंट्रल जात असल्याने खान्देशातील प्रवाशांना या गाडीचा मोठा फायदा होणार आहे.

भुसावळ येथून सुटणारी गाडी (०९०५२) भुसावळ -मुंबई सेंट्रल त्रि-साप्ताहिक विशेष गाडी ही दि. २८ फेब्रुवारीपर्यंत होती, ही गाडी आता १ मे पर्यंत चालवली जाणार आहे. तर गाडी (०१०५१) मुंबई सेंट्रल- भुसावळ त्रि-साप्ताहिक विशेष गाडी ही २७ फेब्रुवारीपर्यंत होती. आता ही गाडी ३० एप्रिलपर्यंत धावणार आहे.

दरम्यान, भारतीय रेल्वेने पॅसेंजर रेल्वेंच्या तिकीट दरात मोठी कपात करण्याची घोषणा केलीय. त्यामुळे तिकीट दर कोरोना महामारीपूर्वीच्या पातळीवर आले आहेत. या निर्णयानंतर भुसावळहुन धावणाऱ्या गाडी क्रमांक ०९०७७-७८ भुसावळ-नंदुरबार गाडीच्या तिकीट दरात कपात करण्यात आलीय. यामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे.

godavari advt (1)

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button