---Advertisement---
जळगाव जिल्हा जळगाव शहर प्रशासन

अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती अर्ज भरण्यास मुदतवाढ

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । ५ जानेवारी २०२२ । अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना महाडीबीटी या पोर्टलवर शिष्यवृततीसाठी अर्ज सादर करण्याची मुदत 31 जानेवारी 2022 पर्यंत वाढविण्यात आली आहे, असे यावल येथील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाच्या प्रकल्प अधिकारी विनिता सोनवणे यांनी प्रसिध्दीस दिलेल्या शासकीय पत्रकान्वये कळविले आहे.

sc 1

अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना आदिवासी विकास विभागाच्या विविध शिष्यवृत्तीचा लाभ देण्यासाठी राज्य शासनामार्फत सन 2018-19 या शैक्षणिक वर्षापासून महाडीबीटी पोर्टल सुरू करण्यात आले आहे. संबंधित पात्र विद्यार्थ्यांनी http://mahadbtmahait.gov.in या संकेतस्थळावरुन अर्ज करणे आवश्यक आहे. सन 2021-22 या शैक्षणिक वर्षाकरिता दिनांक 15 डिसेंबर 2021 पासून ऑनलाईन अर्ज भरणेस सुरुवात झाली आहे. जुने आणि नवीन विद्यार्थ्यांनी व महाविद्यालयांनी तत्काळ अर्ज भरण्याची कार्यवाही करावी. तसेच सन 202-21 या शैक्षणिक वर्षातील विद्यार्थी, महाविद्यालयांना ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी 31 जानेवारी 2022 पर्यंत मुदतवाढ दिली आहे.

---Advertisement---

महाविद्यालयांनी शासन निर्णयातील अटी व शर्थीनुसार पात्र असलेले, ऑनलाईन प्राप्त झालेल्या अर्जांची तत्काळ तपासणी करावी. विद्यार्थ्यांनी तसेच महाविद्यालयांनी अर्ज भरताना महाडीबीटी संकेतस्थळावर दिलेल्या मार्गदर्शक सूचना व नियमांचे वाचन करावे. त्रुटींच्या पूर्ततेसाठी परत पाठविलेले अर्ज विद्यार्थ्यांनी व महाविद्यालयांनी सुधारणा करुन पुन्हा पाठविणे आवश्यक आहे. पात्र विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित राहिल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित विद्यार्थी तसेच महाविद्यालयांची राहील.विविध प्रकारच्या शिष्यवृत्ती योजनेचे अर्ज पडताळणी करुन ऑनलाईन अर्ज सादर करण्याची मुदत 31 जानेवारी,2022 असल्याने विद्यार्थ्यांनी तसेच महाविद्यालयांनी याची नोंद घ्यावी. तसेच महाविद्यालयांनी त्यांच्या स्तरावरुन याबाबत जनजागृती करावी. जेणेकरुन जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना सदर योजनांबाबत माहिती मिळेल व विहित वेळेत विद्यार्थी ऑनलाईन अर्ज भरतील.असे प्रकल्प अधिकारी विनिता सोनवणे यांनी प्रसिध्दीस दिलेल्या शासकीय पत्रकान्वये कळविले आहे.

हे देखील वाचा :

            

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---