जळगाव जिल्हा

शिष्यवृत्ती अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १४ सप्टेंबर २०२१ । भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृती, शिक्षण फी, परीक्षा व इतर शैक्षणिक योजनेंतर्गत अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी महाडीबीटी संकेतस्थळावर शिष्यवृत्तीचे ऑनलाईन अर्ज भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या संकेतस्थळावर शिष्यवृतीचे अर्ज भरण्यासाठी ३० सप्टेंबर, २०२१ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे, असे समाजकल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त योगेश पाटील यांनी प्रसिध्दीस दिलेल्या शासकीय पत्रकान्वये कळविले आहे.

कोविड-१९ विषाणूच्या संसर्गामुळे काही महाविद्यालये बंद आहेत. ऑनलाइन पध्दतीने अभ्यासक्रम शिकवला जात आहे. त्यामुळे विद्यार्थी महाविद्यालयात उपस्थित राहत नाही. त्यामुळे शिष्यवृत्तीचे ऑनलाईन अर्ज सादर केले नाहीत. विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित राहू नये म्हणून शिष्यवृत्तीचे अर्ज भरलेले नसलेल्या विद्यार्थ्यांसाठी शासनाने मुदतवाढ दिली आहे.

राज्यातील विविध महाविद्यालयामध्ये सन २०२०-२१ मध्ये प्रवेश घेतलेल्या व शिष्यवृत्तीचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी त्यांचे अर्ज तत्काळ https:// mahadbtmahait.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाइन सादर करावेत.

जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयांनी महाविद्यालयस्तरावर याबाबत विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती करावी. महाविद्यालयांनी महाविद्यालय स्तरावर प्रलंबित असणारे अर्ज तत्काळ ऑनलाइन प्रणालीतून संबंधित जिल्ह्याचे सहाय्यक आयुक्त समाजकल्याण कार्यालयाकडे वर्ग करावेत, असे आवाहन समाजकल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त श्री. पाटील यांनी कळविले आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button