डॉक्टर दिनानिमीत्त तज्ञांचा सत्कार

जुलै 1, 2025 5:01 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । १ जुलै २०२५ । गोदावरी फाउंडेशन संचलित डॉ. गुणवंतराव सरोदे आयुर्वेद मेडिकल कॉलेज, हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटर, जळगाव येथे डॉक्टर दिनानिमीत्त तज्ञांचा सत्कार करण्यात आला.

dr day

यावेळी प्रमुख अतिथी म्हणून सेवा निवृत्त वैद्यकिय संचालक डॉ.एन एस आर्विकर,अधिष्टाता डॉ प्रशांत सोळंके,वैद्यकिय अधिक्षक डॉ. प्रेमचंद पंडीत,आयुर्वेद महाविद्यालयाचे अधिष्टाता डॉ. हर्षल बोरोले, डॉ.निखिल चौधरी,डॉ.उमाकांत पाटील इ मान्यवर उपस्थीत होते.

सुरूवातीला मान्यवरांचे हस्ते दिपप्रज्वलन व धन्वतरी पूजन करण्यात आले. मान्यवरांचा सत्कार शुभेच्छा पत्र व पुष्पगुच्छ देवून करण्यात आला. वैद्यकिय क्षेत्र हे सेवेच क्षेत्र असून रूग्णाबददल आपले पणाची भावना असली तर यश नक्की मिळवू शकतो असे डॉ.पंडीत यांनी तर डॉ. अर्विकर यांनी वाचन आणि प्रत्यक्ष काम एकमेकांना पूरक असून यशस्वी डॉक्टर होण्यासाठी हया दोन्ही गोष्टी गरजेच्या आहेत असे सांगितले.

प्रमुख अतिथी डॉ. प्रशांत सोळंके यांनी डॉक्टर ही पदवी मिळवण्यासाठी कठोर परिश्रम,साधना गरजेची असल्याचे सांगितल अधिष्टाता डॉ हर्षल बोरोले यांनी सर्व विदयार्थ्यांना या दिनाचे महत्व विषद करून सांगितले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन अल्फीया पिंजारी व विरेंद्र ताडे व आभार बाबासाहेब पाटील यांनी मानले यावेळी आयुर्वेद महाविद्यालयातील सर्व तज्ञ डॉक्टर व प्राध्यापकांचा सत्कर करण्यात आला.यशस्वीतेसाठी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now