⁠ 
गुरूवार, एप्रिल 25, 2024

उद्या शिंदे-भाजप मंत्रिमंडळाचा विस्तार; संभाव्य यादीत जळगावातील ‘या’ दोन जणांचा समावेश

जळगाव लाईव्ह न्यूज । ४ ऑगस्ट २०२२ । महाराष्ट्र मंत्रिमंडळ विस्ताराबाबत मोठी माहिती समोर आलीय. राज्य मंत्रिमंडळाचा (Cabinet Expansion) विस्तार 5 ऑगस्टला होणार आहे. राजभवन येथे सायंकाळी सहा वाजता मंत्रिमंडळातील मंत्र्यांच्या शपथविधी होईल, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार उद्या १२ मंत्री शपथ घेऊ शकतात. त्यामध्ये भाजप गटातील ७ आणि एकनाथ शिंदे गटातील ५ मंत्री शपथ घेणार असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यानुसार यामध्ये जळगाव जिल्ह्यातील दोन नेत्यांच्या नावाचा समावेश आहेत. भाजपकडून गिरीश महाजन (Girish Mahajan) तर शिंदे गटाकडून गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांच्या नावाचा समावेश आहेत.

राज्यात महाविकास आघाडी सरकार कोसळल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी एकत्र येत नवीन सरकार स्थापन केली होती. शिंदे -भाजप सरकार स्थापन होऊन महिना लोटला. मात्र अद्यापही मंत्रिमंडळ विस्तार होऊ शकला नाही. त्यावरून शिंदे-फडणवीस सरकारवर (Shinde-Fadnavis Government) विरोधकांकडून जोरदार टीका केली जातेय.

अशातच उद्या राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. यात १२ मंत्री शपथ घेऊ शकतात. भाजप गटातील ८ आणि एकनाथ शिंदे गटातील ८ मंत्री शपथ घेणार असल्याचे सांगण्यात येत आहे. यात भाजपकडून चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार, गिरीश महाजन, चंद्रशेखर बावनकुळे
राधाकृष्ण विखे पाटील, आशिष शेलार, प्रवीण दरेकर यांचा समावेश आहेत. तर शिंदे गटाकडून गुलाबराव पाटील, उदय सामंत, अब्दुल सत्तार, दादा भुसे, शंभुराज देसाई यांच्या नावाचा समावेश आहे.

दरम्यान, गुलाबराव पाटील हे महाविकास आघाडी सरकारमध्ये पाणी पुरवठा मंत्री होते. तसेच जळगावचे पालकमंत्री पद देखील होते. एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेविरुद्ध बंद पुकारले होते. त्यावेळी गुलाबराव पाटील यांनी शिंदे यांना पाठींबा दिला होता. त्यामुळे सध्या शिंदे गट आणि भाजपचे सरकार असल्याने त्यांची पुन्हा मंत्रिमंडळात वर्णी लागणार आहेत. मात्र गुलाबराव पाटील यांना कोणती खाती देणार हे अद्यापही समोर आलेलं नाहीय.

तर दुसरीकडे भाजपचे संकटमोचन म्हणून ओळख असलेले गिरीश महाजन यांचा देखील पहिल्या मंत्रिमंडळ विस्तारात समावेश आहे. भाजप-शिवसेना युतीच्या सरकारमध्ये गिरीश महाजन यांच्याकडे जलसंपदा मंत्री पद होते. त्यामुळे आता त्यांच्याकडे कोणत्या खात्याची जबाबदारी सोपवली जाणार हे अद्यापही समोर आलेलं नाहीय.