माजी.खा. डॉ.उल्हास पाटील यांनी टँकरद्वारे भागविली तिघ्रेवासियांची तहान

जळगाव लाईव्ह न्यूज । १५ मे २०२३ । रणरणत्या उन्हात भीषण पाणीटंचाईचा नागरिकांना सामना करावा लागत आहे. यापार्श्वभुमीवर गोदावरी फाऊंडेशनचे अध्यक्ष तथा माजी खासदार डॉ.उल्हास पाटील यांनी तिघ्रे गावात पाणीटँकर पाठवून नागरिकांची तहान भागविली.

भीषण पाणीटंचाईमुळे तिघ्रे गावातील रहिवाशांना पिण्याचे पाणी देखील मिळणे कठीण झाले होते, अशा परिस्थीतीत डॉ.उल्हास पाटील यांनी सामाजिक दातृत्वाच्या भावनेतून स्व:खर्चाने पाण्याचे टँकर पाठविले. गावात पाण्याचे टँकर येणार ही माहिती मिळताच तिघ्रे वासियांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले.

tancer jpg webp

याप्रसंगी टँकरभोवतील कुटूंबातील पुरुष, महिला, मुले यांनी गर्दी केली. याबद्दल तिघ्रे गावकर्‍यांनी डॉ.उल्हास पाटील यांचे आभार मानले.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now