जळगाव शहरात कोविड टास्क फोर्सची स्थापना
जळगाव लाईव्ह न्यूज । २९ एप्रिल २०२१ । जळगाव शहरात वाढती कोरोना संसर्गाची गंभीर परिस्थिती लक्षात घेऊन जमात-ए-इस्लामी हिंद जळगाव यांनी कोविड फ्री महाराष्ट्र टास्क फोर्स ची स्थापना केली आहे.
सदर टास्क फोर्सच्या माध्यमाने कोरोना महामारी मध्ये आवश्यक असलेली औषधींच्या किमतीवर नियंत्रण ठेवण्याचे काम करणे, शहराच्या विविध हॉस्पिटलमध्ये उपलब्ध असलेले बेडची संख्या व विविध सुविधाची माहिती जनतेला कळविणे तसेच रुग्णांना आकारण्यात येणारे अवाजवी बिलावर लक्ष ठेवणे व ते शासनाने ठरविल्याप्रमाणे आकारण्यासाठी पाठपुरावा करणे कोरोना रुग्णांसाठी शासनाची विविध योजनांची लाभ जनतेला मिळवून देणे, सरकारी व खाजगी रुग्णालयांमध्ये असलेले रुग्णांची विविध समस्यांचे निराकरण करणे तसेच गरजू रुग्णांसाठी तज्ञ डॉक्टरांच्या हेल्पलाइन नंबर सुद्धा जारी करण्यात येणार आहे.
सदर टास्क फोर्स मध्ये सोहेल अमीर साहब, वसीम शेख साहेब, सुफियान शेख, सद्दाम पटेल, यासिर असीम, नोमान खान, रफिक खान सर, शारिक शेख, तन्वीर शेख, रेहान खाटीक, युसुफ मनियार, अबरार खाटीक इत्यादी लोक शामिल आहे तसेच आरिफ देशमुख साहेब हे सदर कोविड टास्क फोर्सचे समन्वयेक म्हणून काम पाहतील. अशी माहिती शहर अध्यक्ष जमात-ए-इस्लामी हिंद जळगाव यांनी एका प्रेस नोटमध्ये दिली आहे.