⁠ 
रविवार, डिसेंबर 15, 2024
Home | जळगाव जिल्हा | अमळनेर | अमळनेर येथे ई-हक्क प्रणाली कक्षाची स्थापना ; नऊ महसूलीचा सेवांचा ऑनलाईन लाभ मिळणार

अमळनेर येथे ई-हक्क प्रणाली कक्षाची स्थापना ; नऊ महसूलीचा सेवांचा ऑनलाईन लाभ मिळणार

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २ ऑगस्ट २०२३ । लोकाभिमुख प्रशासनासाठी ई-हक्क प्रणाली लाभदायक ठरणार आहे. यामुळे नागरिकांना महसूली सेवा ऑनलाईन मिळणार आहेत. असे प्रतिपादन अमळनेर उपविभागीय अधिकारी महादेव खेडकर यांनी आज येथे केले. महसूल दिन १ ऑगस्ट पासून तालुक्यात महसूल सप्ताहाचा शुभारंभ श्री‌.खेडकर यांच्या हस्ते झाला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी अमळनेर तहसीलदार रूपेशकुमार सुराणा , कर्मचारी व नागरिक उपस्थित होते.

ई-हक्क प्रणाली बाबत मार्गदर्शन, प्रचार व प्रसिध्दी करिता ‘नागरिक मदत कक्ष’ स्थापन करण्यात आला आहे. या कक्षाचे उद्घाटन सर्वसामान्य अभ्यागताच्या हस्ते फीत कापून करण्यात आले.

श्री.खेडकर म्हणाले की, ई-हक्क प्रणाली अंतर्गत ई-करार बोजा दाखल करणे, गहाणखत बोजा दाखल करणे, बोजा कमी करणे, वारस नोंद, मयताचे नाव कमी करणे, अ.पा. क कमी करणे, ए.कु.क कमी करणे, विश्वस्त नाव बदलणे, संगणकीकृत ७/१२ व हस्तलिखित ७/१२ चुक दुरुस्ती या नऊ प्रकारच्या फेरफारांसाठी खातेदारांना पीडीई P.D.E. ( Public data entry) मधून अर्ज करता येणार आहे.

याप्रसंगी महसूल अधिकारी-कर्मचारी यांचे इयत्ता १० वी व १२ वी उत्तीर्ण १३ गुणवंत पाल्यांचा सत्कार करण्यात आला. सुंदर माझे कार्यालयांतर्गत तहसील कार्यालयाचे आवार स्वच्छ करुन सुशोभिकरण करण्यात आले.

महसूल सप्ताहात युवा संवाद, एक हात मदतीचा, जनसंवाद, सैनिक हो तुमच्यासाठी, महसुल संवर्गातील कार्यरत सेवानिवृत्त अधिकारी – कर्मचारी संवाद व महसूल सप्ताह सांगता समारंभ या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. महसूल सप्ताहांतर्गत दिल्या जाणाऱ्या सेवांचा लाभ नागरिकांनी घ्यावा.असे आवाहन तहसीलदार रुपेशकुमार सुराणा यांनी केले आहे.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.