जिल्हा पंचायत नियोजन समितीची स्थापना; जि.प.च्या सर्वसाधारण सभेत निर्णय
जळगाव लाईव्ह न्यूज । १ ऑक्टोबर २०२१ । १५ व्या वित्त आयोगाअंतर्गत जिल्हा परिषद विकास आराखडा तयार करण्यासाठी जिल्हा पंचायत नियोजन समितीची स्थापना करण्याचा निर्णय शुक्रवार दि.१ रोजी झालेल्या जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत घेण्यात आला. ऑनलाईन पद्धतीने ही सभा पार पडली.
जिल्हा परिषदेची ऑनलाईन सर्वसाधारण सभा शुक्रवार दि.१ रोजी दुपारी १.३० वाजता अध्यक्षा रंजना पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. बैठकीस जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पंकज आशिया यांसह जि.प. सदस्य व सर्व विभाग प्रमुख अधिकारी ऑनलाईन पद्धतीने उपस्थित होते. सभेत १५ वित्त आयोगात करण्यात येणाऱ्या कामांवर चर्चा करण्यात आली. यावेळी १५ व्या वित्त आयोगाअंतर्गत जिल्हा परिषद विकास आराखडा तयार करण्यासाठी जिल्हा पंचायत नियोजन समितीची स्थापना तसेच क्षेत्रीय कार्यगट स्थापन करण्याच्या निर्णय घेण्यात आला.
यांचा आहे समितीत समावेश
जिल्हा पंचायत नियोजन समितीच्या अध्यक्षपदी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा रंजना पाटील, उपाध्यक्षपदी जि.प.चे उपाध्यक्ष लालचंद पाटील यांची तर सदस्य म्हणून शिक्षण व आरोग्य सभापती रवींद्र पाटील, महिला व बालकल्याण सभापती ज्योती पाटील, समाज कल्याण सभापती जयपाल बोदडे, कृषी समिती सभापती उज्वला माळके, जि.प. सदस्य पोपट भोळे, मनोहर पाटील, शशिकांत पाटील, प्रभाकर सोनवणे, नंदकिशोर महाजन, मधुकर काटे, नंदा पाटील, अमित देशमुख, अरुणा पाटील, सविता भालेराव, पल्लवी सावकारे, प्रभाकर गोटू सोनवणे, मंगला जाधव, विद्या खोडपे, दिलीप पाटील, रजनी पाटील, महेंद्र पाटील, निर्मला पाटील, काशिनाथ माळी, प्रकाश पाटील, पूनम पाटील, मिलिंद चौधरी, राहुल पाटील, किशोर पाटील, कल्पना पाटील, मोहन महाजन, भास्कर पाटील, विकास सोनवणे, मीराबाई पाटील, श्रीकांत कोळी, सुनंदा पाटील यांसह मुख्य कार्यकारी अधिकारी, पंचायत समितीचे १५ सभापती, जिल्हा नियोजन अधिकारी, विभागीय वन अधिकारी, एनआरएलएमचे १ प्रतिनिधी, जिल्हा कृषी अधिकारी, आमंत्रित सदस्य म्हणून कृषी उत्पन्न पणन समितीचे अध्यक्ष, जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक, स्वच्छता तज्ञ्, १, अर्थशास्त्राचे प्राध्यापक १ आदींची निवड करण्यात आली. समितीचे सदस्य सचिव ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राहतील. अशा एकूण ६३ जणांची जिल्हा परिषदस्तरावर समिती गठीत करण्यात आली आहे.