---Advertisement---
जळगाव जिल्हा कृषी

शेतकऱ्यांच्या अडचणीचे निरसण करण्यासाठी जिल्हास्तरावर नियंत्रण कक्ष स्थापन

---Advertisement---


जळगाव लाईव्ह न्यूज | ३० एप्रिल २०२३ |  जिल्ह्यात खरीप हंगाम २०२३ सुरु झाला असून यामध्ये बियाणे, खते व किटकनाशकांबाबत शेतकरी, कंपनी प्रतिनिधी व विक्रेते यांच्या क्षेत्रीयस्तरावरील अडचणी व तक्रारींचे वेळेत निराकरण होणे गरजेचे आहे.

cotton rain jpg webp

तसेच कृषि निविष्ठांचा काळाबाजार व साठेबाजी रोखण्यासाठी, त्यांचे उत्पादन, वितरण व विक्री नियंत्रित करणे आवश्यक आहे. याबाबत येणाऱ्या अडचणीचे तात्काळ निराकरण करण्यासाठी जिल्हास्तरावर नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला असल्याची माहिती संभाजी ठाकूर, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी, जळगाव यांना प्रसिद्धी पत्रकान्वये दिली आहे.

---Advertisement---


या नियंत्रण कक्षाशी दररोज सकाळी १० ते सायंकाळी ७ या वेळेत संपर्क साधण्यासाठी भ्रमणध्वनी क्रमांक ८९८३८३९४६८, कार्यालयीन दूरध्वनी क्रमांक ०२५७-२२३९०५४ तसेच टोल फ्री क्रमांक १८००२३३४००० या क्रमांकावर सुद्धा संपर्क करता येईल. सोबतच अडचण किंवा तक्रार saojalgaon@gmail.com वर सुद्धा ईमेल द्वारे पाठवता/नोंदवता येणार आहे.


जिल्हास्तरावर बियाणे, खते व किटकनाशके यांच्या गुणवत्ता व पुरवठ्यासंबंधी तक्रार निवारण कक्षात अरुण तायडे, जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक, जळगांव मो. क्र. ८९८३८३९४६८, संतोष भावसार- वरिष्ठ लिपीक- मो. क्र. ८९८३८३९४६८, समाधान देवरे- कृषि सहाय्यक- मो. क्र. ८९८३८३९४६८ या अधिकारी/कर्मचारी यांची नियुक्ती करण्यात आलीी आहे. असेही श्री. ठाकूर यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---