⁠ 
शुक्रवार, मार्च 29, 2024

दहावी ते पदवीधरांना सरकारी नोकरीची सुवर्णसंधी…ESIC अंतर्गत महाराष्ट्रात बंपर भरती

10 वी ते पदवीधर उमेदवारांना नोकरी मिळवण्याची संधी आहे. कारण ईएसआयसीमध्ये (ESIC Bharti 2021-22) 3600 पदांवर भरती प्रक्रिया सुरु झाली आहे. यापैकी महाराष्ट्रात ५९४ जागा आहेत. अर्ज प्रक्रिया १५ जानेवारी २०२२ पासून सुरू होणार आहे. अर्ज करण्याची अंतिम मुदत १५ फेब्रुवारी २०२२ आहे.

या पदांसाठी होणार भरती?

१. अप्पर डिव्हिजन क्लर्क (UDC)
२. लघुलेखक (स्टेनो.)
३. मल्टी-टास्किंग स्टाफ (MTS)

शैक्षणिक पात्रता :

उच्च श्रेणी लिपिक (UDC) –(i) पदवीधर किंवा समतुल्य (ii) संगणकाचे ज्ञान

स्टेनोग्राफर – (i) 12वी उत्तीर्ण (ii) कौशल्य चाचणी नियम: डिक्टेशन: 10 मिनिटे @80 श.प्र.मि., लिप्यंतरण: संगणकावर 50 मिनिटे (इंग्रजी), 65 मिनिटे (हिंदी).

मल्टी टास्किंग स्टाफ (MTS) – 10वी उत्तीर्ण.

वयोमर्यादा :

कर्मचारी राज्य विमा निगममध्ये वरिष्ठ विभागीय क्लार्क, अप्पर डिव्हिजनल क्लार्क, स्टेनोग्राफर या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय किमान 18 वर्षे तर कमाल 27 वर्ष असावे. आरक्षणाचा लाभ घेणाऱ्या उमेदवारांना शासकीय नियमाप्रमाणं वयोमर्यादेमध्ये सूट दिली जाणार आहे.

वेतन
अप्पर डिव्हिजनल क्लार्क पदावर निवड होणाऱ्या उमेदवाराला 25 हजार 500 ते 81 हजार 110 रुपये वेतन सातव्या वेतन आयोगानुसार दिलं जाणार आहे. तर स्टेनोग्राफर पदावर काम करणाऱ्या व्यक्तीला 18 हजारे ते 56 हजार 900 रुपये वेतन दिलं जाईल. एससी, एसटी आणि दिव्यांग, महिला उमेदवारांसाठी 250 रुपये फी निश्चित करण्यात आली आहे. तर, इतर प्रवर्गातील उमदेवारांसाठी 500 रुपये शुल्क निश्चित करण्यात आलंय.

अर्ज शुल्क : SC/ST/PWD/ विभागीय उमेदवार, महिला उमेदवार आणि माजी सैनिक – रु. २५०/-
इतर प्रवर्गासाठी – रु. ५००/-

अर्ज पद्धती – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – १५ फेब्रुवारी २०२२

अधिकृत वेबसाईट : www.esic.nic.in

जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

अर्ज दाखल कसा करायचा?
स्टेप 1 : सर्वप्रथम ईएसआयसीची वेबसाईट esic.nic.in ला भेट द्या.
स्टेप 2: मोबाईल नंबर, ईमेल आयडी नोंदवून अर्जातील माहिती भरा
स्टेप 3 : अर्जातील माहिती जतन करुन पुढील बटनावर क्लिक करा
स्टेप 4 : अर्जाचं शुल्क जमा करा.
स्टेप 5 : कागदपत्रं स्कॅन करुन अपलोड करा

हे देखील वाचा :