तीन गावांचा तालुका एरंडोल पण पोलीस स्टेशन पाळधी तालुका धरणगाव
जळगाव लाईव्ह न्यूज । १८ मे २०२२ । गिरणा काठ परिसरातील सावदे प्रचा, टाकरखेडा व वैजनाथ ही गावे एरंडोल तालुक्यातील असून या गावाच्या ग्रामस्थांना तहसील कार्यालय, पंचायत समिती , गिरणा पाट बंधारे यांच्यासह इतर शासकीय कार्यालयांसाठी त्यांना एरंडोल येथे यावे लागते मात्र पोलीस स्टेशनच्या कामासाठी त्यांना पाळधी पोलिस स्टेशनला जावे लागते कारण ही तिन्ही गावे आधीपासून पाळधी पोलीस स्टेशनला जोडण्यात आली आहे. ती एरंडोल पोलीस स्टेशनला जोडली तर एरंडोल पोलीस स्टेशनच्या छोट्या कार्यक्षेत्रात काही प्रमाणात वाढ होऊ शकते असे जाणकारांचे मत आहे.
जवळपास २२ ते २५ वर्षापूर्वी एरंडोल तालुक्याचे विभाजन होऊन धरणगाव हा स्वतंत्र तालुका झाला. धरणगाव तालुक्यात ८९ गावे तर एरंडोल तालुक्यात जेमतेम ६५ गावे समाविष्ट करण्यात एरंडोल तालुक्याचे विभाजन झाले की चिरफाड झाली. कि विच्छेदन झाले अशा आशयाची टीका होऊ लागली. वास्तविक एरंडोल या मूळ तालुक्याला जास्त गावे जोडायला हवी होती मात्र तसे न झाल्यामुळे एरंडोल तालुक्याची सर्वच बाबतीत उपेक्षा होत असल्याचे परिणाम जाणवत आहेत.
धरणगाव तालुका निर्मिती झाल्यानंतर जवळपास चार ते पाच वर्षापर्यंत धरणगाव तालुक्यातील बोरगाव बुद्रुक बोरगाव खुर्द विवरे व भवरखेडे ही गावे एरंडोल पोलीस स्टेशनला कायम राहिली होती. मात्र त्यानंतर ही चारही गावे धरणगाव पोलीस स्टेशनला जोडण्यात आली त्यामुळे एरंडोल पोलीस स्टेशनच्या गावांची संख्या चारने कमी झाली याउलट तालुक्याच्या पूर्व भागातील सावदे प्रचा , टाकरखेडा व वैजनाथ ही तीन गावे अजूनही पाळधी पोलीस स्टेशनला कायम आहेत. या गावांचा तालुका एरंडोल पोलीस स्टेशन पाळधी व धरणगाव असा हा अजब प्रकार अनुभवास येत आहे
ReplyForward |