⁠ 
शुक्रवार, सप्टेंबर 20, 2024
Home | जळगाव जिल्हा | एरंडोल | एरंडोलच्या भूमापकाने घेतले विष, सुसाईड नोटमुळे उलगडणार कारण

एरंडोलच्या भूमापकाने घेतले विष, सुसाईड नोटमुळे उलगडणार कारण

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २७ नोव्हेंबर २०२१ ।  एरंडोल येथील तालुका भूमी अभिलेख कार्यालयातील भमापन परीक्षक संजय नामदेव पाटील यांनी कार्यालयात विषप्राशन करून आपली जीवनयात्रा संपवली आहे. या आत्महत्येचं कारण अद्याप अस्पष्ट असून पाटील यांच्या खिश्यात चिट्ठी मिळून आली असून हि चिट्ठी आता पुढील सत्य उलगडणार असल्याचं समजतय.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एस. एन. पाटील यांना 15 नोव्हेंबर पासून मोजणी कार्यक्रम देण्यात आलेला होता. दरम्यान सोमवारी रात्री संजय नामदेव पाटील ( ५० ) यांनी विषप्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मंगळवारी सकाळी येथील कर्मचारी संजय माळी व इतर कर्मचारी कर्तव्यासाठी आले असता कार्यालयाचा दरवाजा बंद आढळून आला कार्यालयाचा दरवाजा उघडण्यासाठी पाटील यांना आरोळ्या मारून प्रयत्न केला असता  प्रतिसाद मिळाला नाही. म्हणून दरवाजा तोडण्यात आला असता एस. एन. पाटील हे जमिनीवर पडलेले आढळून आले व त्यांचे हात थरथर कापत असून हाताला झटके येत होते.

पाटील हे कार्यालयातच मुक्कामास राहत होते पाटील यांच्या वर उपचार करण्यासाठी त्वरित 108 क्रमांकाच्या रुग्णवाहिकेद्वारे ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले तेथून त्यांना जळगाव येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठविण्यात आले. नातेवाईकांनी त्या ठिकाणावरुन अण्णा हल्लाबोल खाजगी रुग्णालयात भरती केले असता डॉक्टरांनी पाटील याना मृत घोषित केले.

सुसाईड नोट मध्ये दळलंय काय? 

एरंडोल येथील तालुका भूमी अभिलेख कार्यालयात 23 पदे मंजूर असून सद्यस्थितीत19 कर्मचारी हे कार्यरत आहे. घटना घडली त्या दिवशी सहा कर्मचारी मोजणी कामासाठी दौऱ्यावर होते व उर्वरित कर्मचारी हे कार्यालयात कामाला होते. एस. एन. पाटील है 2017 पासून या कार्यालयात कार्यरत आहे याप्रकरणी विविध चर्चा रंगत असल्यातरी शेवटी पोलीस तपासाअंती सत्य समोर येईल. सुसाईड नोट मधील कारण अद्याप गुलदस्त्यात आहे.

author avatar
टीम जळगाव लाईव्ह