जळगाव जिल्हाराजकारण

आसोदा परिसरातील शेकडो युवकांचा शिवसेनेत प्रवेश

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २७ ऑक्टोबर २०२४ । जळगाव ग्रामीण मतदार संघात शिवसेना शिंदे गटाची ताकद दिवसेंदिवस वाढतं चालली आहे. अशातच आसोदासह परिसरातील शेकडो युवकांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्यावर विश्वास ठेवून शिवसेनेत प्रवेश केला.

विधानसभा क्षेत्रप्रमुख श्याम कोगटा यांच्या मार्गदर्शनात या कार्यकर्त्यांनी शिवसेनेचा भगवा हाती घेतला. मंत्री गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत संजू कोळी, दीपक सपकाळे, विलास सोनवणे, सचिन माळी, सुनील कोळी, भीमराव माळी, मधू खंबायत, श्रावण कुंभार, विलास बिऱ्हाडे, सुरेश माळी, किरण कुंभार, अनिल जयकर, कैलास कोळी आदिंनी शिवसेनेत प्रवेश केला. नगरसेवक मनोज चौधरी, युवासेना जिल्हाप्रमुख रोहित कोगटा, जितेंद्र गवळी, निकम, उपमहानगर प्रमुख पवन ठाकूर, विशाल निकम, राहुल गवळी उपस्थित होते.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button