जळगाव लाईव्ह न्यूज । ४ जानेवारी २०२२ । के.सी.ई च्या पी.जी.महाविद्यालयात सामाजिक आरोग्य व जागरुकता या विषयावर निबंध लेखन व पोस्टर प्रेझेंटेशन आयोजित करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख अध्यक्ष प्राचार्य डॉ.व्ही. एस.झोपे, कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी प्रा.राजेश सगळगिळे, मु.जे महाविद्यालय जळगाव व सुक्ष्मजीव विभाग प्रमुख प्रा. संदीप पाटील यांच्या उपस्थितीत पार पडला.
आधुनिक काळातील आजारच्या प्रचार व प्रसार यांच्या अपुऱ्या माहिती व व्यक्तिगत स्वच्छतेच्या अभावाने, स्वतः कडे दुर्लक्ष केल्यामुळे अनेक आजारांना सामोरे जावे लागते. दैनंदीन जवीनाशी संबंधीत आरोग्याचे ज्ञान सर्वांना व्हावे , जनजागृती व्हावी म्हणुन विविध आजारांवर जागरूकता निर्माण करणाऱ्या विषयाचा या पोस्टरमध्ये समावेश करण्यात आले. या पोस्टर प्रेझेनटेशन मध्ये विविध विषय जसे विविध आजारावर आहार उपचार जसे कोविद १९, कोड ( Vitiligo) पांढरे कोड, बुरशीजन्य संसर्ग, रक्तक्षय मधुमेह, मानसिक आरोग्य, टायफॉईड इ. विविध विषयावर पोस्टर तयार करण्यात आले. या कार्यक्रमामध्ये अनेक विद्यार्थ्यांनी पोस्टर प्रेझेनटेशन अतिशय उत्तम प्रकारे केले. सुक्ष्मजीव विभाग प्रमुख प्रा. संदीप पाटील यांनी प्रास्ताविक केले ते म्हणाले, सर्वानी जागतिक आरोग्याची जबाबदारी घेतली पाहिजे. निबांध स्पर्धेत प्रथम क्रमांक’ गुनश्री भालेराव, द्वितीय समाधान माळी तर पोस्टर प्रेझेंटेशन मध्ये प्रथम रायपुरे अस्मिता, पाटील प्राजक्ता व सायली नारखेडे तर द्वितीय क्रमांक चव्हाण हर्षल, कापसे अंकुर, जया पाटील यांना मिळाले.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी सुक्ष्मजीव विभागतील प्रा.धनश्री पाटील, प्रा.भाग्यश्री वाणी व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. M.Sc. १ व २ च्या सर्व विद्यार्थीनीने सक्रिय सहभाग घेतला. या कार्यक्रमास विद्यार्थ्यांच्या कार्याचे मान्यवरांनी कौतूक केले.
हे देखील वाचा :
- विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी! १०वी आणि १२वी परीक्षेच्या तारखा जाहीर
- सरकारी नोकर भरतीतील शिंदे-फडणवीस सरकारच्या गेमचेंजर पॉलिसीमुळे पात्र युवकांना संधी
- 10वी आणि 12वी परीक्षेच्या फीमध्ये वाढ; आता इतके रुपये जास्त मोजावे लागणार?
- लाल किल्ल्यावरून मेडीकल शिक्षणासंदर्भात पंतप्रधान मोदींकडून मोठी घोषणा
- विनापरीक्षा नोकरीची मोठी संधी ; 3256 जागांवर निघाली भरती, पगारही भरघोष मिळेल..