जळगाव लाईव्ह न्यूज । १९ एप्रिल २०२२ । “स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव” वर्षानिमित्त आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय भारत सरकार व राष्ट्रीय आरोग्य अभिमान आणि सार्वजनिक आरोग्य महाराष्ट्र शासन यांच्या मार्फत उपजिल्हा रुग्णालय चोपडा येथे भव्य मोफत आरोग्य मेळावा चे आयोजन करण्यात आले आहे, सदर मेळाव्यास विशेष अतिथी म्हणून खासदार रक्षाताई खडसे उपस्थित होत्या.
सदर भव्य मोफत आरोग्य मेळाव्याचे तालुका स्तरावर आयोजन करण्यात आलेले असून, मेळाव्यात मोफत आरोग्य विषयक जनजागृती तपासणी, उपचार तसेच लाभार्थ्यांचे युनिक हेल्थकार्ड आयडी तयार करण्यात येऊन वितरण करण्यात येणार आहे. यावेळी खासदार श्रीमती रक्षाताई खडसे यांनी आरोग्य मेळाव्याच्या सर्व विभागात फिरून संबंधित आरोग्य कर्मचारी यांचे कडून सविस्तर माहिती घेतली व जास्तीत जास्त नागरिकांनी सदर मोफत आरोग्य मेळाव्याचा लाभ घेण्याचे आव्हाहन केले.
यावेळी खासदार रक्षाखडसे यांच्यासह चोपडा तालुका भाजपा अध्यक्ष पंकज पाटील, शहराध्यक्ष गजेंद्र जैसवाल, जिल्हा उपाध्यक्ष राकेश पाटील, जि.प.सदस्य गजेंद्र सोनवणे, जिल्हा चिटणीस सौ.रंजनाताई नेवे, अनिताताई नेवे, महिला मोर्चा तालुकाध्यक्ष सौ.जोत्स्नाताई चौधरी, जिल्हा व्यापारी आघाडी उपाध्यक्ष रविंद्र मराठे, भाजयुमो अध्यक्ष प्रकाश पाटील, अल्पसंख्याक मोर्चा अध्यक्ष संजय जैन, सरचिटणीस हनुमंतराव महाजन, मनोहर बडगुजर, भरत सोनगिरे, मिलिंद वाणी, बबन पाटील, प्रविण चौधरी, धर्मदास पाटील,सुरेश माळी, तुषार पाठक, गोपाल पाटील, विजय बाविस्कर, लक्ष्मण पाटील, परेश धनगर, जितेंद्र चौधरी इ. उपस्थित होते.