सोमवार, डिसेंबर 11, 2023

मनपाच्या मुख्य इमारतीत पाण्या अभावी तहानले कर्मचारी व नागरिक

जळगाव लाईव्ह न्यूज । १२ जून २०२३ । जळगाव शहरात पाणी समस्या आहे हे काही नवीन राहिलेले नाही. शहरातील कित्येक नागरिकांना २० – २० दिवस पाणी मिळत नाहीये. अश्यावेळी नागरिक यासाठी मनपा प्रशासनाला वेठीस धरत आहेत. मात्र आता मनपा कर्मचाऱ्यांनाच प्यायाला हक्काचे पाणी मिळत नसल्याचे पाहायला मिळाले.

तर झाले असे की, सोमवारी सायंकाळ पर्यंत भर उन्हात कर्मचाऱ्यांना पाणी पिण्यास मिळाले नाही. जळगाव शहर महानगरपालिकेची पाण्याची मोटर अचानक खराब झाली. यामुळे टाकीमध्ये पाणी जाऊ शकले नाही. पर्यायी टाकी रिकामी राहिली. टाकी भरली न गेल्याने कर्मचाऱ्यांना भर दुपारी प्यायला पाणी मिळाले नाही.

संपूर्ण इमारतीमध्ये पाण्याचा तुटवडा असल्यामुळे कर्मचाऱ्यांना पाणी विकत घेऊन यावे लागले. नागरिकांचेही यामुळे भलतेच हाल झाले. भर दुपार, कडाक्याचं ऊन आणि प्यायला नाही पाणी अशी हालत या कर्मचाऱ्यांची वर्गाचे आणि कामा निमित्त आलेल्या नागरिकांचे झाले होते. मात्र सायंकाळी चारच्या सुमारास मोटार दुरुस्त झाली आणि कर्मचाऱ्यांना पाणी प्यायला मिळाले.

यात अजून एक महत्त्वाची बाब म्हणजे, संपूर्ण उन्हाळा मनपा कर्मचाऱ्यांना गरम पाणी पिऊन काढावा लागला होता. मनपात असलेले थंड पाण्याचे फिल्टर बंद पडल्याने मनपा कर्मचाऱ्यांना गरम पाणी प्यावे लागत होते. गेला काही दिवसापूर्वी फिल्टर सुरू झाले. त्यामुळे यंदाचा मनपा कर्मचाऱ्यांना नेहमीच लक्षात राहिले यात काही वाद नाही.