---Advertisement---
जळगाव जिल्हा

उच्च शिक्षण घेण्यावर भर द्या – डॉ. केतकी पाटील

---Advertisement---

मा.मुख्यमंत्री वसंतराव नाईक जयंती निमित्त रावेर बंजारा समाजातर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव

जळगाव लाईव्ह न्यूज । ३ जुलै २०२४ । दहावी, बारावी पर्यंतच शिक्षण घेऊन थांबू नका तर उच्च शिक्षित व्हा, मोबाईल, इंटरनेट चा शिक्षणासाठी योग्य वापर करा, शिक्षण घेऊन आपल्या ज्ञानात वाढ करा आणि समाजासाठी कार्य करा असे प्रतिपादन भाजपा महिला मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष डॉ. केतकी ताई पाटील यांनी केले.

Ketkitai News2 jpg webp

हरित क्रांतीचे प्रणेते तथा महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक जयंती निमित्त १ जुलै रोजी रावेर शहरात बंजारा समाजातर्फे पाराचा गणपती मंदिरापासून स्वामी विवेकानंद विद्यामंदिर पर्यंत शोभायात्रा काढण्यात आली. त्यानंतर तालुक्यातील बंजारा समाजाचे दहावी बारावी गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ आयोजित करण्यात आला होता.

---Advertisement---

या प्रसंगी मिरवणुकीत बंजारा समाजाचे दफडा वाद्य मुख्य आकर्षण ठरले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी आश्रमाचे संत श्री दिव्य चैतन्य महाराज होते. प्रमुख अतिथी म्हणून भाजपा जिल्हाध्यक्ष अमोल जावळे, गोदावरी फाउंडेशनच्या संचालिका तथा भाजपा महिला मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष डॉक्टर केतकी ताई पाटील, युवा नेते धनंजय चौधरी, यावलचे माजी सभापती भरत महाजन, माजी नगराध्यक्ष पद्माकर महाजन, पो नि. डॉ.विशाल जयस्वाल , क्षेत्रपाल अधिकारी अजय बावणे, बेटी पढाव बेटी बचाव संयोजिका सारिका चव्हाण, अर्जुन जाधव मा. सरपंच पाल, रवींद्र पवार स्वामी संस्थापक ,सचिन पाटील कृ.बा. स. सभापती आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी पाल, लोहारा, जुनूने लालमाती, कुसुंबा, ऐनपुर, आभोडा तांडा, गुलाबवाडी, के-हाळा, रावेर इ. तांड्यातून विद्यार्थी आणि समाज बांधव उपस्थित होते. यावेळी डॉ.केतकी पाटील यांनी मार्गदर्शन करतांना शिक्षण जेवढे घेता येईल तेवढे घ्यावे. एसएससी परीक्षा उत्तीर्ण होणे ही सुरुवात आहे. मोबाईलचा उपयोग शिक्षणासाठी करावा. राज्य सरकारने महिलांसाठी शिक्षण मोफत केले आहे या योजनेचा अधिकाधिक लाभ घ्यावा. हे रावेर येथे टॅलेंट आहे याचा उपयोग गावाच्या प्रगतीसाठी करा असे सांगितले.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी बंजारा समाज विद्यार्थी परिषदेचे दिनेश पवार, साई राठोड, दिलीप राठोड, आर्यन चव्हाण, विकास चव्हाण, तेजस वंजारी, रोहन, दीपक, रोहित,अक्षय कृष्णा, ऋषिकेश, गोविंद,सुदाम, जीवन हर्षल, सुमित आदी कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. राष्ट्रीय बंजारा टायगर चे जिल्हाध्यक्ष संतोष राठोड ता.अध्यक्ष सुरेश पवार, इंटरनॅशनल स्कूलचे महेंद्र पवार, रमेश राठोड , राजु पवार सर यांच्या अनमोल सहकार्य लाभले. प्रास्ताविक विनय पवार यांनी केले. विजय पवार यांनी सूत्रसंचालन तर रमेश राठोड यांनी आभार प्रदर्शन केले.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---