---Advertisement---
हवामान महाराष्ट्र राजकारण

लाजिरवाणा पराभव : भाजपच्या बालेकिल्ल्यात काँग्रेसने उधळला गुलाल

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । २ मार्च २०२३ ।  कसबा पेठेत झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपला लाजिरवाण्या पराभवाला सामोरे जावे लागले आहे. कारण भाजपच्या बालेकिल्याला महाविकास आघाडीने भाजपच्या एकछत्री अमलाला सुरुंग लावला आहे. कसबा पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी प्रतिस्पर्धी हेमंत रासने यांना पराभवाची धूळ चारली आहे.

potnivanuk pune jpg webp webp

कसबा पेठ मतदार संघात भाजपकडून हेमंत रासने यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर काँग्रेसकडून रविंद्र धंगेकर यांच्या नावाची घोषणा करण्यात आली होती. ‘कसब्यातून रासने आणि धंगेकर याच्यात चुरशीची लढत झाली. या कसबा पोटनिवडणुकीत भाजपला मोठा धक्का बसला आहे. भाजप उमेदवार हेमंत रासने यांचा धक्कादायक रित्या पराभव झाला आहे.

---Advertisement---

काँग्रेसच्या रवींद्र धंगेकर यांनी ११०४० मतांनी भाजपचे उमेदवार हेमंत रासने यांचा पराभव केला आहे. पहिल्या फेरीपासून रवींद्र धंगेकर आघाडीवर असल्याचे दिसून आले होते. पाचव्या फेरीनंतर हेमंत रासने रवींद्र धंगेकर यांच्याशी चुरस करताना दिसून आले मात्र धंगेकर यांनी पुन्हा एकदा विजयी आघाडी घेतली आणि दणदणीत विजय मिळवला.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---