⁠ 
सोमवार, मे 6, 2024

महाराष्ट्रातील जनतेला मोठा झटका ; आजपासून वीज दर महागले, ‘हे’ आहेत नवीन दर?

जळगाव लाईव्ह न्यूज । १ एप्रिल २०२३ । महागाई सर्वसामान्यांची पाठ काही सोडत नाहीय. आधीच या महागाईतून होरपळून निघणाऱ्या राज्यातील जनतेला आणखी एक मोठा झटका बसला आहे. तो म्हणजे आजपासून वीज दर महाग झाले आहेत. एकीकडे उन्हाचा पारा वाढत असून त्यातच वीज कंपन्यांनी जनतेला दरवाढीचा जोरदार शॉक दिला आहे.

महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेड (MSEDCL), बेस्ट, अदानी आणि टाटा पावरच्या वीज दरात ही वाढ झाली आहे. आर्थिक तोटा भरुन काढण्यासाठी महावितरण कंपनीने आर्थिक भार वीज ग्राहकांवरच टाकण्याचा निर्णय घेतला आहे. घरघुती वीजेच्या दरात सहा टक्क्यांची वाढ झाली आहे.

कोणत्या कंपनीनं किती केली दरवाढ?
MSEDCL च्या ग्राहकांना 2023-24 मध्ये सरासरी 2.9 टक्के तर 2024-25 साठी 5.6 टक्के दरवाढ केली आहे. घरगुती वीजेच्या दरात 2023-24 साठी सहा टक्के तर 2024-25 साठी सहा टक्के वाढ झाली आहे. तर बेस्टच्या ग्राहकांना 2023-24 साठी वीज दरात सुमारे 5.07 टक्के तर 2024-25 साठी 6.35 टक्के अधिक मोजावे लागणार आहेत. टाटा पावरच्या ग्राहकांना सरासरी 2023-24 साठी 11.9 टक्के वाढ झाली आहे. तर 2024-25 साठी 12.2 टक्के वाढ झाली आहे. अदानी इलेक्ट्रिसिटीच्या ग्राहकांना 2023-24 साठी सरासरी 2.2 टक्के तर 2023-24 साठी २.१ टक्के अधिक मोजावे लागणार आहेत.

महावितरण कंपन्यांचे ग्राहकांसाठीचे वीजदर पंचवार्षिक असतात. त्यानंतर या दरांचा मध्यकालीन आढावा घेतला जातो. सध्याचे दर एक एप्रिल 2020पासून लागू झाले आहेत. त्यानुसार त्यांचा आता मध्यकालीन आढावा घेतला जात  असून विद्युत नियामक आयोगाने महावितरणच्या प्रस्तावाला हिरवा कंदील दिल्यास या वर्षी एक एप्रिलपासून नवीन दर लागू होऊ शकतात.