जिल्ह्यात इंधन व पर्यावरण संरक्षणासाठी इलेक्ट्रिक बसे धावणार
जळगाव लाईव्ह न्यूज । २९ मे २०२२ । इंधन बचत व पर्यावरण संवर्धनासाठी एसटी महामंडळाच्या जळगाव विभागातून लवकरच ५० इलेक्ट्रिक एसटी बस सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. महाराष्ट्रातील इतर विभागांप्रमाणे या बसेसचा ताफा लवकरच दाखल हाेणार असल्याचे सांगण्यात येते आहे.
इलेक्ट्रिक बससाठी जळगावात मेन चार्जिंग पॉइंट राहणार आहे. जामनेर, पाचोरा, चोपडा या ठिकाणी चार्जिंगच सब पॉइंट काढण्याचे नियोजन आहे. या इलेक्ट्रिक बसला २०० किलोमीटरसाठी दोन तास चार्जिंग अपेक्षित आहे .
बसला साध्या गाडीचे भाडे
इलेक्ट्रिक बसला साध्या गाडीचे भाडे आकारण्यात येणार आहे. त्यात प्रतिटप्पा ८ रुपये ७० पैसे दर आकारण्यात येणार आहे.
१ जूनला ‘श्रीगणेशा’
परिवहन दिनानिमित्ताने १ जूनपासून पुणे-नगर बसने पुण्यातून या इलेक्ट्रिक बसचा शुभारंभ होताे आहे. जळगाव विभागाने ५० बस मिळण्यासाठी प्रस्ताव दिला आहे. जळगाव विभागातून इलेक्ट्रिक बस कधीपर्यंत धावणार याबाबत मंडळ लवकरच निर्णय घेईल. – भगवान जगनोर, विभाग नियंत्रक.