जळगाव लाईव्ह न्यूज | १८ ऑक्टोबर २०२३ | जळगाव जिल्ह्यात १६७ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका, तर ८१ ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुकीची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. जिल्ह्यातील ग्रामपंचायतीच्या १२८ रिक्त पदांसाठी निवडणुका होणार आहेत. ५ नोव्हेंबरला मतदान होणार आहे. दरम्यान, अर्ज दाखल करण्यास २० ऑक्टोबर ही शेवटची तारीख आहे.
असा आहे निवडणूक कार्यक्रम
१६ ते २० ऑक्टोबर – अर्ज दाखल करणे
२३ ऑक्टोबर – अर्जांची छाननी
२५ ऑक्टोबर – अर्ज माघारी, चिन्हवाटप
मतदान – ५ नोव्हेंबर
उमेदवारांना ही कागदपत्रे आवश्यक
- नामनिर्देशनपत्र नमुना अ (नियम ८)
(सर्व फॉर्मवर स्वाक्षरी असणे बंधनकारक) - उमेदवाराने करावयाचे घोषणापत्र क्रमांक १
(वयाबाबत ग्रा. पं. ठेकेदार नसलेबाबत व थकबाकी नसलेबाबत) - उमेदवाराने करावयाचे घोषणापत्र क्रमांक २
(जातप्रवर्गाबाबत जातीचा दाखला व वैधता प्रमाणपत्र) - नावात बदल (स्त्री असेल तर) शपथपत्र
-परिशिष्ट – २
(अपराधाबद्दल, जंगम मालमत्ता, दायित्वबाबत, शैक्षणिक अर्हता व पडताळणीचे घोषणापत्र)
-अपत्याचे घोषणापत्र
शौचालय असलेबाबत स्वयंघोषणापत्र
ग्रामपंचायत ठेकेदार नसलेबाबत स्वयंघोषणापत्र
जातीचा दाखला
जात वैधता प्रमाणपत्र
हमीपत्र (परिशिष्ट- २) खर्चाचा दैनंदिन अहवाल
निवडणूक खर्च १ महिन्याचे आत देणेबाबत हमीपत्र
चिन्हांच्या प्राधान्यक्रमांचा नमुना (नमुना -अ)
मतदार यादीची प्रत
(त्याच प्रभागात नाव नसल्यास) प्रमाणित प्रत
नवीन बँक खाते पासबुक झेरॉक्स
दोन फोटो व नमुना स्वाक्षरी (उमेदवार)
वयाचा पुरावा
ओळखीचा पुरावा
शैक्षणिक अर्हता
रहिवासी दाखला (वास्तव्याचा दाखला)
अनामत रक्कम भरल्याची पावती
तालुकानिहाय ग्रामपंचायती
पारोळा तालुक्यात ११. ठिकाणी सार्वत्रिक तर ९ ठिकाणी पोटनिवडणुका होणार आहे. भडगाव तालुक्यात ८ सार्वत्रिक व ५ पोटनिवडणुका, अमळनेर तालुक्यात १४ सार्वत्रिक व ११ पोटनिवडणुका, चाळीसगाव तालुक्यात १२ सार्वत्रिक व १० पोटनिवडणुका, भुसावळ तालुक्यात ७ सार्वत्रिक व ४ पोटनिवडणुका, पाचोरा तालुक्यात ४ सार्वत्रिक व १४ पोटनिवडणुका, एरंडोल तालुक्यात ७ सार्वत्रिक व ३ पोटनिवडणुका, रावेर तालुक्यात १३ सार्वत्रिक व २१ पोटनिवडणुका, जामनेर तालुक्यात १७ सार्वत्रिक व २० पोटनिवडणुका, चोपडा तालुक्यात २२ सार्वत्रिक व ४ पोटनिवडणुका, जळगाव तालुक्यात १५ सार्वत्रिक व ४ पोटनिवडणुका, मुक्ताईनगर तालुक्यात ४ सार्वत्रिक व ४ पोटनिवडणुका, यावल तालुक्यात ४ सार्वत्रिक व ४ पोटनिवडणुका, धरणगाव तालुक्यात १८ सार्वत्रिक व ३ पोटनिवडणुका अशा एकून १६७ सार्वत्रिक व १२८ पोटनिवडणुका होत आहेत.