---Advertisement---
बोदवड

मोठी बातमी! बोदवड कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक स्थगित, नेमकं कारण काय?

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । ७ एप्रिल २०२३ । राज्यात कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणूक होणार असून अनेक बाजार समित्यांवर वर्षानुवर्षे आपलेच अधिराज्य गाजवणाऱ्या मातब्बरांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. दरम्यान, अशातच जळगाव जिल्ह्यातील बोदवड येथील कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक स्थगित करण्यात आली आहे. तसेच वरणगाव उपबाजाराला भुसावळ बाजार समितीत समावेश करून घेण्याच्या प्रस्तावाला राज्याच्या सहकार खात्याने मंजुरी दिली आहे. यासंदर्भातील शासकीय परिपत्रक नुकतेच जाहीर झाले आहे.

bodwad krushi bajar samiti jpg webp webp

राज्यासह जळगाव जिल्ह्यातील ११ कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणुका होऊ घातल्या असून यासाठीची प्रक्रिया देखील सुरू झालेली आहे. बोदवड बाजार समितीच्या अंतर्गत मुक्ताईनगर आणि वरणगाव येथील उपबाजार यांचा देखील अंतर्भाव करण्यात आलेला आहे. यातील वरणगाव उपबाजाराला भुसावळ बाजार समितीला जोडण्यात यावे असा प्रस्ताव आधी सादर करण्यात आला होता. राज्याच्या सहकार खात्याने याला मंजुरी दिली आहे. याबाबतचे परिपत्र क देखील जारी करण्यात आले आहे.

---Advertisement---

या अनुषंगाने बोदवड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अंतर्गत असलेल्या वरणगाव उपबाजाराला भुसावळशी जोडण्यात येत असल्याने येथील निवडणूक तूर्तास स्थगित करण्यात येत असल्याचे या परिपत्रकार नमूद करण्यात आले आहे. बोदवड सोबत राज्यातील खुलताबाद, कुंटुर आणि आष्टी येथील निवडणुका देखील स्थगित करण्यात आल्याचे या परिपत्रकात म्हटले आहे.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---