एकनाथराव खडसे यांचे महापौर, विरोधी पक्षनेत्यांनी केले अभिष्टचिंतन
जळगाव लाईव्ह न्यूज । २ सप्टेंबर २०२२ । माजी मंत्री आ. एकनाथराव खडसे यांचा आज २ सप्टेंबर रोजी वाढदिवस असून यानिमित्ताने वाढदिवसाच्या पूर्व संध्येला काल गुरुवार, दि. 1 सप्टेंबर 2022 रोजी सायंकाळी महापौर जयश्री सुनिल महाजन व महापालिकेतील विरोधी पक्षनेते डॉ. सुनिल महाजन यांनी त्यांच्या जळगावातील ‘मुक्ताई’ या निवासस्थानी जाऊन प्रत्यक्ष भेट घेत वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, राज्याच्या विधानसभेतील धुरंधर व्यक्तिमत्त्व असलेले माजी विरोधी पक्षनेते तथा माजी मंत्री, जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे ज्येष्ठ संचालक, आदिशक्ती मुक्ताईचे उपासक तथा विद्यमान विधान परिषद सदस्य आ एकनाथरावजी खडसे यांचा आज 2 सप्टेंबर रोजी वाढदिवस आहे. यानिमित्ताने वाढदिवसाच्या पूर्व संध्येला गुरुवार, दि. 1 सप्टेंबर 2022 रोजी सायंकाळी जळगाव शहराच्या प्रथम नागरिक व महापौर तथा जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालिका व जळगाव जिल्हा सरकारी नोकरांची सहकारी पतपेढीच्या तज्ज्ञ संचालिका जयश्री सुनिल महाजन व महापालिकेतील विरोधी पक्षनेते डॉ. सुनिल महाजन यांनी त्यांच्या जळगावातील ‘मुक्ताई’ या निवासस्थानी जाऊन प्रत्यक्ष भेट घेत वाढदिवसाच्या त्यांना शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी या दाम्पत्याने आ.एकनाथरावजी खडसे यांना निरामय आरोग्यासह दीर्घायुष्य लाभो हे अभिष्टचिंतन करीत त्यांचे आशीर्वादही घेतले.
.