जळगाव जिल्हामहाराष्ट्रराजकारण
एकनाथराव खडसेंनी केले गोपीनाथ मुंडेंना अभिवादन
जळगाव लाईव्ह न्यूज । ३ जून २०२३ । आमदार एकनाथराव खडसे यांनी आपली कन्या रोहिणी खडसे यांच्यासह दिवंगत भाजप नेते गोपीनाथराव मुंडे यांना अभिवादन केले.आज गोपीनाथ गडावर जाऊन दिवंगत नेते गोपीनाथराव मुंडे यांना अभिवादन केले. खडसे यांच्या सोबत माजी मंत्री तथा गोपीनाथरावांचे पुतणे आमदार धनंजय मुंडे हे देखील होते.
नुकतेच एकनाथराव खडसे यांनी पंकजा मुंडे यांनी केलेल्या वक्तव्यावर रोश व्यक्त केला होता . भारतीय जनता पक्ष तळागाळात पोहचवणार्यांची गळचेपी होत असल्याचा आरोप त्यांनी केला होता. यानंतर त्यांनी आज गोपनीनाथराव यांना अभिवादन केले. तर, आजच ते पंकजा मुंडे यांची भेट देखील घेण्याची शक्यता आहे.