⁠ 
गुरूवार, मार्च 28, 2024

राज ठाकरे-देवेंद्र फडणवीस यांची भेट, एकनाथराव खडसे म्हणाले..

जळगाव लाईव्ह न्यूज । १६ जुलै २०२२ । शुक्रवारी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांची भेट घेतली. जवळपास या दोन्ही नेत्यांमध्ये दीड तास चर्चा रंगल्याने राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरु होत्या. दरम्यान, देवेंद्र फडणवीस राज ठाकरे यांच्या भेटीवर राष्ट्रवादीचे नेते एकनाथराव खडसे (Eknath Khadse) यांनी एक मोठा दावा केला आहे.

काय म्हणले खडसे?
‘आजारी पडल्यानंतर भेट घेणं स्वाभाविक आहे मात्र दीड तासाच्या चर्चेत मनसेनं सत्तेत सामील व्हावं अशी चर्चा झाली का? एकनाथ शिंदे यांच्या गटाला आगामी काळात कुठेतरी जावे लागले. कोर्टाने काही निर्णय दिला तर एक तर प्रहार गटात जावे लागेल किंवा मनसेमध्ये जावे लागणार आहे. त्यांना कोणत्या तरी गटामध्ये सामील व्हावे लागणार आहे. मनसेत जाण्याच्या दृष्टीने सामील होण्याबाबत चर्चा झाल्याचे अंदाज व्यक्त केले जात आहे, असा दावा एकनाथ खडसे यांनी केला.

तसेच यावेळी त्यांनी शिंदे-भाजप सरकारवर देखील टोला लगावला आहे. राजकारणामध्ये चिठ्ठी देण्याचे प्रकार हे चालत राहतात. कधी ते लेटर तर कधी प्रेमाची चिठ्ठी असते तर कधी सूचना असतात. देवेंद्र फडणवीस यांना एकनाथ शिंदे यांच्या हाताखाली काम करण्याची एकनिष्ठ संधी त्यांच्या पक्षाने दिली आहे. त्यामुळे आपल्या अनुभवाचा फायदा मुख्यमंत्र्यांना व्हावा म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे यांना चिठ्ठीद्वारे सूचना केली असेल, असं म्हणत खडसे यांनी देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावला. तसंच शिंदे गट हा मनसेमध्ये सामील होण्याची शक्यताही खडसेंनी नाकारली नाही.

दरम्यान, राज्यात मुसळधार पावसाने हजेरी लावल्याने अनेक ठिकाणी पुराच्या पाण्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. अनेक गाव वाहून गेली आहेत. लोक निर्वासित झाली आहेत. जनावरे वाहून गेली आहेत. शेती पुराने वाहून गेली आहे. शेतकरी हवालदिल झाले आहेत. त्यांचे अश्रू पुसण्यासाठी सरकारकडून कोणीही गेलेला नाही. त्यामुळे पूरग्रस्तांना तातडीने मदत केली पाहिजे. पण सरकारकडे संवेदनशीलता राहिली नाही. 15 दिवस झाले हे सरकार जवेवणावळीत व्यस्त आहे. फाईव्हस्टार हॉटेलमद्ये आमदारांना घेऊन जाणं, जेवण देणं सुरू आहे. तिकडे फाईव्हस्टारमध्ये जेवण द्यायचे तर द्या. पण सर्वसामान्यांना दिलासा कोण देणार? असा सवाल राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी केला आहे.