कुछ नही होनेवाला है, मै तुम्हारे उर पे बैठनेवाला हूँ – एकनाथराव खडसे

ऑक्टोबर 28, 2022 11:27 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । २८ ऑक्टोबर २०२२ । विरोधक रोज म्हणतात कुछ ना कुछ होनेवाला है. मात्र, कुछ नही होनेवाला है. मै तुम्हारे उरा पे बैठनेवाला हूँ. मला कितीही त्रास दिला तरी मी सर्वांच्या ऊरावर बसेन, असा इशारा एकनाथ खडसे यांनी राज्य सरकारला दिला आहे. रावेर तालुक्यातील ऐनपूर येथील राष्ट्रवादीच्या जनसंवाद यात्रेला संबोधित करताना खडसे यांनी हा इशारा दिला आहे.

shinde fadanvis khadse jpg webp

यावेळी खडसे म्हणाले कि, विरोधकांकडून सातत्याने छळ करून मला अडकविण्यात येत आहे. काही ना काही खोटे नाटे करून मला जेलमध्ये टाकायचे आणि निवडणुका सुरळीत करायच्या, असा त्यांचा प्रयत्न आहे. पण तुम्हा जनतेच्या आशीर्वादाने मी सर्वांना पुरून उरेल, असे खडसे म्हणाले.

दरम्यान, काल मुक्ताईनगरच्या अनेक खडसे समर्थक पदाधिकाऱ्यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. जिल्ह्याचे राष्ट्रवादीचे सोशल मीडिया प्रमुख युवराज पाटील, मुक्ताईनगर चे राष्ट्रवादी तालुका सरचिटणीस वाय डी पाटील, प्रशांत पाटील यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत शिंदे गटात प्रवेश केला आहे. मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्यावर विश्वास ठेवत मंत्री गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत हा प्रवेश पार पडला

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now