जळगाव शहरराजकारण

लेकीवरील हल्ल्यानंतर एकनाथराव खडसे संतापले, शिवसेना आमदारावर जहरी टिका..

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २८ डिसेंबर २०२१ । राष्ट्रवादीच्या नेत्या रोहिणी खडसे यांच्या वाहनावर सोमवारी अज्ञातांनी हल्ला केल्याची घटना घडली असून या घटनेने राज्यात खळबळ उडाली आहे. या हल्ल्यावरून अनेकांनी निषेध व्यक्त केला असून लेकीवरील झालेल्या हल्ल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) संतापले आहेत. या हल्ल्याच्या मागे शिवसेनेचे (Shiv Sena)स्थानिक आमदार चंद्रकांत पाटील (MLA Chandrakant Patil) यांचाच हात असल्याचा आरोप खडसे यांनी अप्रत्यक्षपणे केला आहे. तसेच दोन दिवसांपुर्वी मी ऑडिओ क्लिप जारी केल्या. ते आणि हल्ला करणारे हे एकच असून गुंड प्रवृत्तीचे लोक आहेत. महिलांवरील अन्याय कदापि सहन करणार नाही, असं एकनाथ खडसे म्हणाले.

काल रात्रीच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर एकनाथ खडसे व रोहिणी खडसे-खेवलकर यांनी आज मुक्ताईनगर येथील निवासस्थानी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी रोहिणी खडसे यांनी हल्लेखोरांमध्ये शिवसेनेचे पदाधिकारी असल्याचं सांगत काहींची नावं सांंगितली, तर एकनाथ खडसे यांनी आमदार चंद्रकांत पाटील यांना लक्ष्य केलं.

हा कसला शिवसेनेचा आमदार? राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रवींद्र पाटील यांनी त्याग केला. राष्ट्रवादीचे कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी रात्रंदिवस मेहनत केली. त्यामुळे चंद्रकांत पाटील आमदार झाला आणि हा स्वत:ला शिवसैनिक म्हणवून घेतो. चंद्रकांत पाटील निवडून आले, त्यावेळी भाजप सेनेची युती होती. या युतीशीही चंद्रकांत पाटलांनी गद्दारी केली आणि निवडून आले. आता राष्ट्रवादीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना छळत आहेत, असं खडसे म्हणाले.

दरम्यान, ‘दोन दिवसांपूर्वी मी ऑडिओ क्लिप जारी केल्या होत्या. त्यातील लोक आणि हल्ला करणारे हे एकच असून हे गुंड प्रवृत्तीचे लोक आहेत. या गुंड प्रवृत्तीच्या लोकांची चौकशी झाली पाहिजे व त्यांच्यावर कठोर कारवाई होऊन शिक्षा झाली पाहिजे, अशी मागणी खडसे यांनी केली. ‘महिलांवरील अन्याय कदापी सहन करणार नाही. मी रोहिणी खडसे यांच्या पाठीशी भक्कमपणे उभा आहे, असंही त्यांनी ठणकावलं.

हे देखील वाचा :

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button